सध्या सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टीने धुमाकूळ घातला असून पाच दिवसांत त्यांच्या इन्स्टाग्रामवर 10 मिलियनहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. या बाबतची एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्यांचे ट्विटर खाते सध्या सस्पेंड करण्यात आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार , कॉक्रोच जनता पार्टीनचे ट्विटर खाते सध्या सस्पेंड करण्यात आले आहे. कॉक्रोच जनता पार्टी या इंस्टाग्राम अकाउंटचा संस्थापक एक मराठी तरुण आहे. या पार्टीच्या माध्यमातून त्यांनी बेरोजगारी आणि सिस्टीमवर सवाल उपस्थित करणारे मीम्स व्हायरल केले आहेत. त्यामुळे त्यांचा पक्ष प्रसिद्ध झाला आहे.