भारतीय स्टेट बँक (SBI) चे तुम्ही ग्राहक असाल तर ही बातमी खास तुमचा साठीच आहे. कारण आता मे महिन्यात तब्बल ६ दिवस ही बँक बंद असणार आहे. त्यामुळे या 6 दिवसात तुम्हाला कोणतेही बँक व्यवहार करता येणार नाहीये. त्या साठी आधीच तुम्ही हे वेळापत्रक चेक कारण तुम्हाला फायद्याचं ठरणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 23 मे 2026 पासून सहा दिवसांसाठी बँकेच्या शाखा बंद राहतील आणि ही बंदी देशभरात वाढवली जाऊ शकते, असं देखील सांगण्यात येत आहे. मात्र, ऑनलाइन सेवा सुरळीत सुरू राहतील, ज्यामुळे तुम्हाला नेट बँकिंग, एटीएम, मोबाइल बँकिंग आणि इतर सेवा वापरता येतील. मात्र, जर तुम्हाला एसबीआय शाखेत कोणतंही काम करायचं असेल, तर ते 23 मे पूर्वी करून घ्या…
SBI बँक सहा दिवस बंद राहणार आहे. कारण वीकेंड, प्रस्तावित दोन दिवसांचा संप आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) ईद-उल-अझहा (बकरीद) निमित्त जाहीर केलेली दोन दिवसांची सुट्टी. आरबीआयच्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, जम्मू आणि काश्मीरमधील बँका बकरीदच्या निमित्ताने 27 आणि 28 मे असे दोन दिवस बंद राहतील. 23 मे रोजी महिन्याचा चौथा शनिवार आहे, त्यामुळे त्या दिवशी बँका बंद राहतील. रविवार असल्यामुळे 24 मे रोजी सर्व एसबीआय बँका बंद राहतील, त्यामुळे हा आठवडा दोन दिवसांच्या वीकेंडचा असेल.
SBI स्टाफ फेडरेशनने 25-26 मे रोजी म्हणजे सोमवार आणि मंगळवारी प्रस्तावित संपाची घोषणा केली आहे. राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) फंड व्यवस्थापकांची भरती आणि निवड यांसारख्या समस्या सोडवण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे. एसबीआय कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारी संघटना, ऑल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ फेडरेशनने देखील जॉब आउटसोर्सिंग, एसबीआयमधील समानतेचे मुद्दे, करिअर प्रगती योजनांचा आढावा, एचआरएमएस आणि कर्मचाऱ्यांवर परिणाम करणाऱ्या इतर समस्यांवर चिंता व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, SBI कर्मचारी देखील संपात सहभागी होऊ शकतात. शाखांचं कामकाज थांबवलं जाऊ शकतं, परंतु ऑनलाइन सेवा सुरू राहतील. एसबीआय ऑनलाइन बँकिंग, यूपीआय पेमेंट आणि एटीएम नेहमीप्रमाणे सुरू राहतील.