व्हायरल ‘कॉकरोच जनता पार्टी’ मध्ये ''या'' दोन आजी-माजी खासदारांचा प्रवेश ? नक्की चाललंय काय ?
व्हायरल ‘कॉकरोच जनता पार्टी’ मध्ये ''या'' दोन आजी-माजी खासदारांचा प्रवेश ? नक्की चाललंय काय ?
img
Nandini khandare More




सध्या सोशल मीडियावर  ‘कॉकरोच जनता पार्टी’ ने चान्गलाच धुमाकूळ घातला आहे. ५ दिवसांत या पार्टीने इन्स्टाग्रामवर १ कोटी फॉलोअर्सचा टप्पा पार करून इतिहास रचला आहे. दरम्यान हा ट्रेंड जोरदार सुरु असून आता या विषयी अनेक नव नवीन अपडेट समोर येत आहेत. 

अवघ्या काही दिवसांत हजारो लोक यात सामील झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या एका वक्तव्यावरून सोशल मीडियावर वाद निर्माण झाला, तेव्हा या ट्रेंडची सुरुवात झाली. यानंतर, अनेक इंटरनेट युजर्नसी तरुण, बेरोजगारी आणि व्यवस्थेबद्दल आपला संताप व्यक्त केला.  कॉकरोच जनता पार्टी हा एक ऑनलाइन राजकीय व्यंग समूह असून, सर्वसामान्य लोकं, विशेषतः तरुणांचा, व्यवस्थेबद्दलचा राग आणि निराशा व्यक्त करण्यासाठी हा समूह तयार करण्यात आला आहे असं बोललं जातं.


30 वर्षांच्या अभिजीत डिपके यांनी हा पक्ष सुरू केला आहे.  या पक्षेचा संस्थापक अभिजीत डिबके यांनी या पक्षाबद्दल सांगितलं. ही फक्त फॅशन किंना ट्रेंड नव्हे तर आता हे एका संघटनेचे स्वरूप घेत आहे. ही केवळ एक तात्पुरती फॅशन असती, तर दोन लाखांहून अधिक लोकांनी आमच्या वेबसाइटवर नोंदणी केली नसती. इन्स्टाग्रामवरील पार्टीशी संबंधित कंटेंटला 4 दिवसांत सुमारे 50 लाख व्ह्यूज आणि प्रचंड प्रतिसाद मिळाला असा दावाही त्यांनी केला.
या पक्षाचा सदस्य होण्यासाठी तुम्ही बेरोजगार, आळशी, नेहमी ऑनलाइन असणारे आणि तुमच्या तक्रारी किंवा राग व्यावसायिक पद्धतीने व्यक्त करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. ही संपूर्ण चळवळ व्यंगात्मक आणि इंटरनेट संस्कृतीच्या माध्यमातून आपला मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

दरम्यान , तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा आणि कीर्ती आझाद हेहा सोशल मीडियावर गंमतीने या पक्षाबद्दल बोलले, तेव्हा या ट्रेंडला आणखी गती मिळाली. या पक्षात सामील होण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे? असं कीर्ती आझाद यांनी विचारलं होतं. 1983 चा वर्ल्डकप जिंकणे हीच पुरेशी पात्रता आहे, असं मजेशीर उत्तर पक्षाकडून यावेळी देण्यात आलं होतं.

इतर बातम्या
Join Whatsapp Group