नीट पेपरफुटी प्रकरणातील सर्वांत मोठा आणि धक्कादायक खुलासा समोर
नीट पेपरफुटी प्रकरणातील सर्वांत मोठा आणि धक्कादायक खुलासा समोर
img
Nandini khandare More



नीट पेपरफुटी प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ निर्माण झालीअसून आता या प्रकरणात अनेक खुलासे होत असून या प्रकरणात अनेक जणांना अटकही करण्यात आली आहे दरम्यान आत अय प्रकरणातील सर्वात मोठा आणि धक्कादायक खुलासा समोर आला आहे. 

नीट  पेपर लीक प्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक आणि मोठा खुलासा समोर आला आहे. परीक्षेत संभाव्य प्रश्न येतील या नावाखाली (गेस पेपर म्हणून) विद्यार्थ्यांना थेट मूळ प्रश्नपत्रिकाच पोहोचवण्यात आली होती. यासाठी तब्बल ६० पानांची एक पीडीएफ (PDF) फाईल विद्यार्थ्यांपर्यंत पाठवण्यात आली होती. हा संपूर्ण गेस पेपर हाताने लिहिलेला होता. 

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, याच फाईलमधील तब्बल १३५ प्रश्न मूळ परीक्षेत जसेच्या तसे (हुबेहूब) आले होते. म्हणजेच, ज्याला ‘गेस पेपर’ म्हटले जात होते, तोच प्रत्यक्षात लीक झालेला खरा पेपर होता. आता केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) याच पेपरला आधार मानून पुढील तपास करत आहे.दरम्यान ,  या प्रकरणी आतापर्यंत ५ राज्यांमधून १० जणांना अटक करण्यात आली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group