भारताचा चीनला मोठा दणका ! नक्की काय घडतंय ?
भारताचा चीनला मोठा दणका ! नक्की काय घडतंय ?
img
Nandini khandare More
 



इराण आणि अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर  सध्या जगभरात खळबळ निर्माण झाली आहे. याचदरम्यान आता एकी मोठी बातमी समोर येत आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अस्थिर वातावरण निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत भारताच्या परराष्ट्र धोरणावर आणि उच्चस्तरीय दौऱ्यांवर जागतिक लक्ष केंद्रीत झाले आहे. पंतप्रधान नरेद्र मोदी विविध देशांच्या भेटी घेत असून द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर भर देत आहेत. भारताचे सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ब्रह्मोस खरेदी करण्याची मोठी इच्छा व्हिएतनामने बोलून दाखवली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हनोई दौऱ्यादरम्यान ब्रह्मोस करारावर चर्चा होणार आहे. 

संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, राजनाथ सिंह पाच दिवसांच्या दौऱ्यावर व्हिएतनाम आणि दक्षिण कोरियाला देखील भेट देत आहेत. राजनाथ सिंह यांनी स्वतः इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपल्या या दाैऱ्याची माहिती दिली. द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याकरिता दोन्ही देशांना भेट देत असल्याचे त्यांनी म्हटले. यादरम्यान महत्वाचे संरक्षण करार होण्याचीही शक्यता आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी भारताला भेट दिली. त्या भेटीदरम्यान, भारताने व्हिएतनामसाठी 500 दशलक्ष डॉलर्सच्या पतपुरवठ्याची घोषणा केली. यासोबतच भारताने व्हिएतनामला तीन ते चार सागरी गस्ती नौका आणि डझनहून अधिक वेगवान गस्ती नौका यांचीही ऑफर दिली. भारत आणि व्हियतनाममध्ये मोठा लष्करी करार होण्याचे संकेत आहेत.

राजनाथ सिंह याकरिताच या दाैऱ्यावर जात असल्याचे सांगितले जातंय. व्हियतनामच्या राष्ट्रपतींनी दिल्ली दाैऱ्यादरम्यान ब्रह्योस मिसाईल करण्याबद्दल चर्चा केली होती. यादरम्यानच आता राजनाथ सिंह यांच्या हनोई दाैऱ्यादरम्यान ब्रह्योस मिसाईल खदेरीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. 2022 मध्ये भारत ने फिलीपींसला 375 मिलियन डॉलरचा करार ब्रह्योस मिसाईलचा केला होता.

फिलीपींसने ब्रह्योस मिसाईल साऊथ चायनाच्या वादात खरेदी केले होते. फिलीपींससारखाच व्हियतनामचा दक्षिण चीन सागरमध्ये बीजिंग यांच्यासोबत जुना वाद आहे. व्हियतनाम आपल्या समुद्री सुरक्षणाकरिता ब्रह्योस मिसाईल भारताकडून खरेदी करू शकते. चीनच्या नाकावर टिच्चून भारत व्हियतनामला मिसाईल देऊ शकतो. स्वत: ब्रह्योस मिसाईलच्या खरेदीकरिता व्हियतनामने रूची दाखवले. त्यामुळे भारत आणि व्हियतनाम यांच्यात याबाबत करार होऊ शकतो. याबाबत आता घडामोडींना वेग आला. हा भारताचा चीनला अत्यंत मोठा दणका म्हणावा लागणार आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group