राजकीय  !  पक्षातील अंतर्गत वादावर अखेर सुनेत्रा पवार यांचा मोठा निर्णय
राजकीय ! पक्षातील अंतर्गत वादावर अखेर सुनेत्रा पवार यांचा मोठा निर्णय
img
Nandini khandare More



राज्यातील घडामोडींना वेग आला असून आता राजकीय पक्षांच्या अंतर्गत वादविवाद चव्हाट्यावर येत आहेत. याच संदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अंतर्गत नाराजी आणि मतभेद वाढल्याचे चित्र दिसत आहे. पक्षाच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरून वाद निर्माण झाला असून काही नेत्यांमध्ये असंतोष व्यक्त केला जात आहे.

निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या पत्रात काही नेत्यांच्या नावांसमोर पदांचा स्पष्ट उल्लेख नसल्याने हा वाद अधिक वाढल्याचे सांगितले जाते. विशेषतः खासदार सुनील तटकरे यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष पदाचा उल्लेख न केल्याने नाराजी व्यक्त होत असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे अरुणाचल प्रदेशातील प्रदेशाध्यक्ष टोको तातुंग यांचे पद स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते.

याच पार्श्वभूमीवर पक्षातील ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनाही बाजूला टाकले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या घडामोडींनंतर सुनील तटकरे यांनी थेट शरद पवार यांची सिल्व्हर ओक येथे भेट घेतल्याने या वादाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान , प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शरद पवारांना भेटलो असं सुनील तटकरेंकडून सांगण्यात आलं. त्यानंतर शरद पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्याबाबत क्षमता असणारे नेते म्हणून कौतुक केलं. त्यांच्या क्षमतेचा कसा वापर करावा, हा त्यांच्या आत्ताच्या नेतृत्वाचा अधिकार आहे, असं शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेला हा विसंवाद आणि मतभेदांची दरी वाढल्यानंतर आता सुनेत्रा पवार सक्रीय झाल्या आहेत. त्यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती आहे. लवकरच पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक बोलवली जाणार आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group