अमेरिका आणि इराण युद्धाच्या झळा आता भारताला तीव्र बसू लागल्या आहेत. होर्मुजचा वाद चिघळला असताना भारतात मात्र महागाईचा भडका उडाला आहे. निवडणुका संपल्यानंतर आता एकापाठोपाठ एक दरवाढ सुरू झाली आहे. CNG, दूध, खाद्यतेल, गॅस सिलिंडर सगळ्या गोष्टी महाग झाल्या असताना आता त्यात पेट्रोल डिझेलच्या दरवाढीची भर पडली आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये प्रति 3 रूपयांनी वाढ करण्यात आली. हा सर्वसामान्य लोकांना मोठा झटका म्हणावा लागणार आहे. आता मुंबईत पेट्रोल 106.50 वर गेले तर डिझेल 93 रूपयांवर पोहोचले आहे.
राज्यात दूध, CNG पाठोपाठ आता पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. पेट्रोल डिझेल महाग झाल्याने पर्यायाने भाजी आणि वस्तू किराणा सगळंच महाग होणार आहे, त्यामुळे तुमचं बजेट कोलमडू शकतं. तुमच्या शहरात किती दर आहेत पाहा
नागपूरमध्ये सध्या पेट्रोलचे दर १०७.१८ पैसे प्रति लिटर मिळत आहे. पेट्रोल ३ रुपये १६ पैसे प्रति लिटर महाग झाल्याने खिशाला चांगल्याच झळा बसणार आहेत. तर डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपये ११ पैसे, सध्या डिझेलचे दर ९३.६९ रुपये लिटर मिळणार आहे. इंधन दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे.
मुंबईत डिझेल ९३.१४ (+३.११) रुपये प्रति लीटरने मिळणार आहे. तर पेट्रोलसाठी लीटरमागे मुंबई १०६.६८ (+३.१४) रुपये मोजावे लागणार आहे. या दरवाढीमुळे आता महागाईचा मोठा भडका उडणार आहे. ट्रान्सपोर्टचा खर्च वाढेल आणि पर्यायाने वस्तूंच्या किंमतीदेखील वाढतील.
पुण्यात पेट्रोल 107.84 तर डिझेल 94.45 रुपये प्रति लीटर मिळत आहे. ठाण्यात 106.84 रुपये तर डिझेल ९६ रुपये ६६ रुपये दर आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल १०६.३४ रुपये प्रति लीटर तर डिझेल ९५.६४ रुपये प्रति लीटर दराने मिळणार आहे. दर वाढल्याच्या नंतर पावर पेट्रोल 117.59 रुपये
रत्नागिरीमध्ये पेट्रोल १०८.५० प्रति लिटर तर डिझेल ९४०३ प्रति लिटर रुपयांने मिळणार आहे. डिझेलच्या दरात सुमारे २२ पैशांची वाढ झाली असून पेट्रोलचे दर स्थिर आहेत. नाशिकमध्ये १०७.९३ तर डिझेल ९४.४१ रुपये प्रति लीटर मिळणार आहे.
सोलापुरात 107.18 तर डिझेल 93.71 रुपये प्रति लीटरवर दर पोहोचले आहेत. कोल्हापुरात पेट्रोल 107.49 तर डिझेल ९४.१५ रुपये डिझेल मिळणार आहे. अमरावती पेट्रोल १०८.१४ तर डिझेल ९४.७८ रुपये प्रति लीटर मिळणार आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणजे किरकोळ महागाई दर देखील वाढला आहे.