पोलीस दलासाठी खुशखबर; घरांसाठी मोठ्या निधीला मंजुरी
पोलीस दलासाठी खुशखबर; घरांसाठी मोठ्या निधीला मंजुरी
img
Nandini khandare More


राज्यातील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून पोलीस कर्मचाऱ्यांना घरबांधणीसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याच्या योजनेला शासनाने मंजुरी दिली

गृहविभागाच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामार्फत पोलीस कर्मचाऱ्यांसाठी घरबांधणी अग्रीम योजने अंतर्गत रु.१७६८ कोटींची कर्जे उभारणी करण्यास मंजुरी देण्यात आली. ही कर्जे उभारणी दि महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह बँक लि, मार्फत करण्यात येणार असून, या योजनेचा लाभ राज्यातील हजारो पोलीस अधिकारी व अंलदारांना मिळणार आहे.

दरम्यान ,  शासनाने यापूर्वी ९७८१ पोलीस अधिकारी व अंमलदारांना या योजने अंतर्गत आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सप्टेंबर २०२३ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्राप्त झालेल्या घरबांधणी अग्रीम प्रस्तावाच्या आधारे आणखी ५४५९ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. याकरीता गृहनिर्माण मंडळाने सर्व क्षेत्रातील बँकांकडून निविदा मागविल्या होत्या. त्यामध्ये अनेक राष्ट्रीयकृत, खासगी व सहकारी बँकांनी भाग घेतला होता. परंतु या सर्वामध्ये कमीत कमी व्याजदर व इतर आकर्षक अटी व शर्तींच्या आधारे ‘दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँके’ची निविदा अंतीम करण्यात आली. मागील काही वर्षात राज्य सहकारी बँकेने आपल्या आर्थिक प्रगतीत सातत्य ठेवल्यानेच हे शक्य झाले आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group