सोनं-चांदीच्या दरांत मोठी वाढ ! १० ग्रॅम सोनं तब्बल ''इतक्या'' रुपयांनी महागलं
सोनं-चांदीच्या दरांत मोठी वाढ ! १० ग्रॅम सोनं तब्बल ''इतक्या'' रुपयांनी महागलं
img
Nandini khandare More



काही दिवसांपासून सोने चांदीच्या दारात मोठ्या प्रमाणात चढ उत्तर होताना दिसत आहे . दरम्यान आता पुन्हा एकदा सोने चांदीच्या दरांची अपडेट आली असून सोनं-चांदीच्या दरांत मोठी वाढ झाली असल्याची बातमी आहे. 

केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर देशांतर्गत सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयाचा थेट परिणाम बुधवारी MCX वरील सोन्या-चांदीच्या दरांवर दिसून आला. सोन्याच्या किमतींनी एका झटक्यात तब्बल ९,२०६ रुपयांची उसळी घेत प्रति १० ग्रॅम १.६२ लाखांचा टप्पा पार केला, तर चांदीनेही विक्रमी झेप घेत प्रति किलो जवळपास २.९६ लाखांवर पोहोचली.

भारतीय वायदा बाजारात (MCX) आज सोन्या आणि चांदीच्या किमतींनी सर्व विक्रम मोडीत काढले असून गुंतवणूकदारांच्या भुवया उंचावल्या आहेत. बाजारात अचानक आलेल्या या प्रचंड उधाणामुळे ट्रेडिंग सत्रात मोठी खळबळ उडाली. सोन्याने प्रति १० ग्रॅममागे तब्बल ९,२०० रुपयांहून अधिक उसळी घेतली आहे, तर चांदीनेही ऐतिहासिक उच्चांकी स्तर गाठला आहे.

ताज्या आकडेवारीनुसार, MCX वर सोन्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅम ९,२०६ रुपयांची विक्रमी वाढ नोंदवण्यात आली. या दरवाढीसह सोन्याचा नवा दर १,६२,६४८ रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. एकाच दिवसात झालेली ही ६ टक्क्यांची वाढ अत्यंत दुर्मिळ मानली जात आहे. सोन्याच्या दरातील या अभूतपूर्व तेजीमुळे बाजारपेठेत खरेदीचा दबाव वाढला असून, सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदारांनी सोन्याकडे आपला मोर्चा वळवला आहे.

दरम्यान , सोन्यापाठोपाठ चांदीनेही गुंतवणूकदारांना मोठा धक्का दिला आहे. MCX वर चांदीच्या किमतीत प्रति किलो १६,७४३ रुपयांची वाढ झाली. यामुळे चांदीचा दर आता २,९५,८०५ रुपये प्रति किलोच्या स्तरावर पोहोचला आहे. चांदीमध्येही सोन्याप्रमाणेच ६ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली, जी चांदीच्या बाजारपेठेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group