रशियाची भारतासाठी मोठी घोषणा; मोठी चिंता दूर
रशियाची भारतासाठी मोठी घोषणा; मोठी चिंता दूर
img
Nandini khandare More




अमेरिका आणि इराणममधील युद्धामुळे  भारताला त्याचे अनेक विपरीत परिणाम सहन करावे लागत आहेत. अनेक बाबतील चिंतेत असलेल्या भारतासाठी मात्र आता दिलासा मिळाला आहे. रशियाकडून भारतासाठी एक मोठी दिलासादायक घोषणा करण्यात आल्याचे वृत्त आहे. 

दरम्यान, अमेरिका आणि इराणमध्ये जरी युद्धविराम झाला असला तरी देखील दोन्ही देशांमध्ये संघर्ष अजूनही सुरूच आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद असल्यामुळे संपूर्ण जगावर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. याचा फटका हा भारताला देखील मोठ्या प्रमाणात बसला आहे. परंतु आता रशियाकडून भारतासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला . रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव हे दिल्लीमध्ये आयोजित परराष्ट्र मंत्र्यांच्या ब्रिक्स बैठकीत सहभागी होणार आहेत, मात्र त्यापूर्वीच त्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. यासोबतच भविष्य काळत रशियाचं भारताबाबत परराष्ट्र धोरण कसं असेल? हे देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.

रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. भारत आणि रशियामध्ये मजबूत राजनौतिक आणि आर्थिक संबंध आहेत. भविष्य काळात ते आणखी मजबूत होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. रशिया भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी कटीबद्ध आहे. रशिया भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा सुरूच ठेवेल त्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये खंड पडणार नाही, आम्ही भारतला कच्च तेल कमी पडू देणार नाही, अशी घोषणाही यावेळी सर्गेई लावरोव यांनी केली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group