आधार कार्ड महत्वाचे सरकारी दस्ताऐवज झाले आहे. त्यामुळे ते जवळपास प्रत्येकाकडे आहे. परंतु जर चुकून तुमचे हे आधार कार्ड हरवले असेल आणि तुम्हाला तुमचा आधार नंबरही माहित नसेल तर मात्र मोठी अडचण निर्माण होऊ शकते. पण आता यासाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. त्यामुळे काळजी करण्याची आवशक्यता नसून एका सोप्या पद्धतीचा अवलंब करून तुम्ही तुमचा हरवलेला आधार नंबर मिळवू शकता, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया...
आधार कार्ड आता सर्वात महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक डॉक्यूमेंट बनले आहे. अनेक कामांसाठी आधार कार्डची गरज असते. बँक खाते उघडायचे असो किंवा तुमची ओळख सिद्ध करायची असो, आधार कार्ड लागत असते. शासनाच्या अनेक योजनांचा फायदा आधार कार्ड लिंकच्या माध्यमातून मिळत असतो. तसेच जवळजवळ सर्व शासकीय कामांमध्ये आधार कार्डचा वापर केला जाते. यामुळे आता जवळजवळ भारतातील प्रत्येक व्यक्तीकडे आधार कार्ड आहे.
एकदा आधार कार्ड बनल्यानंतर तुम्ही कधीही युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) च्या वेबसाइटवरून सहजपणे ऑनलाइन आधार मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर माहीत असणे आवश्यक आहे. परंतु जर तुमचे आधार कार्ड हरवले असेल आणि जर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर माहीत नसेल, तर काय करावे? यासंदर्भात तुम्हाला माहिती देणार आहोत.
तुमचा आधार कार्ड हरवले आहे आणि नंबर माहीत नाही, तरी चिंता करु नका. या परिस्थितीत तुम्हाला युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच यूआयडीएआयकडून मदत मिळणार आहे.
> वेबसाइटच्या होम पेजवरील “My Aadhaar” वर क्लिक करा, त्यानंतर “Retrieve Lost or Forgotten EID/UID” पर्याय निवडा. तुमच्या समोर एक फॉर्म उघडेल, त्यात खालील माहिती प्रविष्ट करा:
> नाव (आधारानुसार नाव)
> मोबाइल नंबर
> ईमेल आयडी (उपलब्ध असल्यास आधारशी लिंक केलेले)
> “Send OTP” वर क्लिक करा, तुमच्या मोबाईल नंबर किंवा ईमेलवर एक OTP पाठवला जाईल. OTP टाकून पडताळणी प्रक्रिया पूर्ण करा.
> पडताळणीनंतर, आधार क्रमांक (UID) किंवा नोंदणी आयडी (EID) तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबर किंवा ईमेलवर पाठवला जाईल.
> सर्वात आधी UIDAI च्या वेबसाइटवर जा. त्या ठिकाणी “रीट्रीव UID/EID” असणाऱ्या पर्यायावर क्लिक करा.
> आधार नंबर (UID) किंवा नामांकन आयडी (EID) या पैकी एका पर्यायाची निवड करा.
> रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर आलेला OTP भरा. त्यानंतर कॅप्चा कोडचे सत्यापन करा.
तुम्हाला तुमच्या मोबाइल क्रमांकावर एक एसएमएस येईल. त्याद्वारे तुम्हाला आधार मिळणार आहे.
> UIDAI हेल्पलाइन नंबर 1947 वर कॉल करुन तुम्हाला आधार क्रमांक मिळता येईल. त्यासाठी कस्टर केअर प्रतिनिधीला तुम्हाला तुमचे नाव, जन्म तारीख यासारखी माहिती द्यावी लागले. त्यानंतर EID मिळणार आहे. पुन्हा 1947 वर कॉल करुन IVRS पर्यायाची निवड करा. त्यानंतर EID, जन्मतारीख, पिन कोड टाका. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक मिळणार आहे.