धक्कादायक ! वटपौर्णिमेच्या दिवशी पत्नीनेच घेतला पतीचा जीव , कुठे घडली घटना ?
धक्कादायक ! वटपौर्णिमेच्या दिवशी पत्नीनेच घेतला पतीचा जीव , कुठे घडली घटना ?
img
नंदिनी मोरे
आजकाल गुन्हेगारीच्या प्रमाणात चिंताजनक वाढ झाली आहे. काल संपूर्ण राज्यात वटपौर्णिचा दिवस महिलांनी मोठ्या उतसाहत साजरा केला. पतीच्या दीर्घायुषयची कामना या दिवशी केली जाते परंतु एका पती साठी ही वटपौर्णिमा काळ बनली आहे. कारण याच दिवशी त्याच्या पत्नीने त्याची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

सांगलीच्या कुपवाडमध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. वटपौर्णिमेच्या रात्री नवऱ्याने डोक्यात कुऱ्हाडीने वार करत नवऱ्याचा खून केल्याची घटना घडली आहे. कुपवाड येथेली प्रकाशनगरच्या एकता कॉलनीत ही घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अनिल लोखंडे असे मृत पतीचे नाव आहे.अनिल लोखंडेचा राधिका ही दुसरी पत्नी असून लग्नाला अवघे १७ दिवसच झाले होते. मृत पती अनिल लोखंडेची पहिली पत्नीचे निधन झाले आहे. अनिल लोखंडेला दोन मुली असून त्यांचे लग्न झाले. अनिलचे जेवणाचे हाल होत असल्याने नातेवाईकांनी दुसरा विवाह केला. मात्र वटपौर्णिमेच्या रात्री राधिकाने कुऱ्हाडीने डोक्यावर आणि हातावर वार केला. त्यात अनिल याचा जागीच मृत्यू झाला. कुपवाड औद्योगिक वसाहत पोलिसांनी राधिकाला ताब्यात घेतले आहे.

लग्न झाल्यापासून अनिल पत्नी राधिकाशी सतत जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. पण राधिकाला ते आवडत नव्हते. त्याच कारणातून चिडून तिने पती अनिल याचा खून केला. घटनेनंतर कुपवाडचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने हालचाली करत संशयित पत्नी राधिका हिला अटक केली. अनिल लोखंडे यांच्या खुनाचं आणखी वेगळे काही कारण आहे का याचाही तपास पोलीस करत आहेत. कारण दोघांच्या लग्नाला अवघे 17 दिवस झाले होते.

इतर बातम्या
Join Whatsapp Group