मोठी बातमी ! ठाकरे गटाला आणखी एक धक्का ;थेट दिल्ली... नेमकं काय घडलं ?
मोठी बातमी ! ठाकरे गटाला आणखी एक धक्का ;थेट दिल्ली... नेमकं काय घडलं ?
img
Nandini khandare More

ठाकरे गटाच्या ६ खासदारांनी बंडखोरी करत शिंदे गटात प्रवेश केला दरम्यान या नंतर राजकारणात मोठा भूकंप आला असून ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का आहे. याचदरम्यान आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. ठकरे गटाला पुन्हा एकदा मोठा आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. 

मिळालेल्या माहितींनुसार,  संसदेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यालय जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सध्या ठाकरे गटाकडे केवळ 3 खासदार उरले असून, त्यांच्या 6 खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे संसदेतील पक्षीय ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

दिल्लीतील संसदेत पक्ष कार्यालय वाटपासाठी खासदारांची संख्या महत्त्वाची मानली जाते. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे कार्यालय कायम राहणार की ते काढून घेतले जाणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लवकरच याबाबत संसदीय पातळीवर निर्णय होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे गटाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, शिंदे गटाने खासदारांच्या प्रवेशानंतर आपली ताकद वाढल्याचा दावा केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणासह दिल्लीतील घडामोडींनाही आता वेग आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group