आजचा सोन्याचा भाव बघून अवाक व्हाल! ''इतक्या'' किमतीने भाव घसरले
आजचा सोन्याचा भाव बघून अवाक व्हाल! ''इतक्या'' किमतीने भाव घसरले
img
Nandini khandare More

जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांमध्ये सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. ऐन धोंड्याच्या महिन्यात ही महागाई ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरली होती. दरम्यान आता मात्र दिलासादायक बातमी समोर आली आहे. 

सोन्याचा भाव कधी घसरतोय तर कधी हाच भाव वाढताना दिसतोय. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करावी की नाही, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. काही महिन्यांपूर्वी सोनं वधारल्याने सामान्यांची डोकेदुखी वाढली होती. 

परंतु आता मात्र सोन्याचा भाव चांगलाच घसरला आहे. सोन्यासोबतच चांदीचा भावही प्रचंड कमी झाला आहे. त्यामुळे दागिने करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे बोलले जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात विक्रमी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात तब्बल 4 हजार 500 रुपयांची तर चांदीच्या दरात 10 हजार रुपयांची घसरण झाली आहे. 

या घसरणीसह सोन्याचा दर जीएसटीसह 1 लाख 44 हजार 200 रुपयांपर्यंत घसरला आहे. तर चांदीचा दर जीएसटीसह 2 लाख 26 हजार 600 रुपयांनी घसरली आहे. आता भविष्यात सोन्याची वाटचाल कशी असेल असे विचारले जात आहे. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group