गेल्या महिनाभरात देशात अनेक ठिकाणी भीषण आगीच्या दुर्दैवी घटना घडल्या असून या घटनांमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. दरम्यान आता अशीच एक भीषण घटना समोर आली आहे या अग्नितांडवात १४ जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे.
उत्तर प्रदेशातील लखनऊच्या अलिगंज येथे सोमवारी एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत १४ लोकांचा मृत्यू झाला आहे.जीव वाचवण्यासाठी तरुणांनी इमारतीवरुन उड्या मारल्याने या घटनेची दाहकता वाढली आहे. या विशेष म्हणजे या भीषण दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांचे वय २० ते २४ वर्षांचे आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात शोक लहर उमटली आहे. या इमारतीतील पेट शॉप आणि गेमिंग झोनमध्ये आगल्याने या तरुणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे.
उत्तर प्रदेशाच्या लखनऊमध्ये अलिंगज येथील एका इमारतील गेमिंग झोन, पेट शॉप आणि कोचिंग सेंटर भीषण आग लागल्याची घटना दुपारी घडली. या आगीमुळे अनेक विद्यार्थ्यांनी इमारतीवरुन उड्या मारल्या. या दुर्घटनेत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर अनेक गंभीर जखमी झाले आहेत. जीव वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या खिडक्यातून उड्या मारल्याचे भयानक दृश्य येथे घडल्याने खळबळ उडाली आहे. लखनऊ येथील जुन्या अलीगंज भागातील पुर्णिया येथील दुर्घटना घडली आहे
राजधानी लखनऊ येथील अलिगंज स्थित येथील पुर्निया भागात सोमवारी एका इमारतीला भीषण आग लागली. या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. या इमारतीला अचानक आग लागल्याने इमारती ज्वाला आणि धुराचे लोट उटले त्यामुळे मोठा अफरातफर माजली. लोकांनी आपला जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या खिडकी आणि जागा मिळून तेथून उड्या मारल्याने अनेकांचा मृत्यू झाला.
सुरुवातीला ही घटना कोचिंग सेंटर आणि लायब्ररीत घडल्याचे म्हटले जात होता. मात्रनंतर पोलिसांनी सांगितले की इमारतीत कोणतेही कोचिंग सेंटर नव्हते. तळमजल्यावर पेट शॉप होते. तर वरच्या मजल्यावर गेमिंग झोन संचालित होते. येथे कर्मचारी गेमिंग सॉफ्टवेअरवर काम करत होते.
इमारतीला उडी मारली
आग लागल्यानंतर वरच्या मजल्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये घबराट उडाली. काही लोक बाथरुममध्ये अडकल्याचे म्हटले जात आहे. नंतर अनेक लोकांना अग्निशमन दल आणि पोलिसांच्या पथकाने लोकांना बाहेर काढले. स्थानिक लोकांनी देखील मदतकार्यात हातभार लावला. काही लोक इमारतीच्या छतावर तर काही अन्य भागातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करु लागले. एका विद्यार्थ्याने जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या वरुन उडी मारल्याने जो जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले आहे.