राजकारण तापलं  ! ओमराजेंच्या पक्ष प्रवेशानंतर उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर; नेमकं काय होणार ?
राजकारण तापलं ! ओमराजेंच्या पक्ष प्रवेशानंतर उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर; नेमकं काय होणार ?
img
Nandini khandare More

सध्या राजकारणात मोठे राजकीय भूकंप येत असून ६ खासदारांच्या बंडखोरीमुले उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. शिवाय त्यांनतर आता उद्धव ठाकरे गटात आता मोठ्या हालचालींना सुरुवात झाली आहे. 

उद्धव बाळासाहेब ठाकरे  पक्षातील सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संघटना मजबूत करण्यासाठी मोठी रणनीती आखल्याची माहिती समोर आली आहे. 28 जून ही तारीख ठरली असल्याचंही सांगितलं जात आहे. बंडखोरी केलेल्या खासदारांच्या मतदारसंघांमध्ये स्वतः दौरा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून, यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे हे ईशान्य मुंबई, धाराशिव, परभणी, हिंगोली, वाशीम आणि शिर्डी या सहा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. यावेळी 28 जून रोजी उद्धव ठाकरे उपस्थित राहून पुन्हा एकदा गटाची पुनर्बांधणी करणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्या स्वागतासाठी तसेच बैठकांसाठी आतापासूनच तयारी सुरू झाली आहे. स्थानिक नेते बैठका घेत असून बॅनरबाजी, मंडपं इत्यादी गोष्टींची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

आधीच, पक्षातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांबाबत जास्त विचार न करता संघटनात्मक कामावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले होते.

इतर बातम्या
Join Whatsapp Group