अग्निवीर जवानाचा कारनामा ! होणाऱ्या पत्नीला लॉज वर नेले; पण लग्न जवळ येताच...
अग्निवीर जवानाचा कारनामा ! होणाऱ्या पत्नीला लॉज वर नेले; पण लग्न जवळ येताच...
img
Nandini khandare More
राज्यातील महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत असून बीड शहरात सध्या गुन्हेगारीने डोके वर काढले आहे दरदिवशी अत्यंत धक्कादायक अशा घटना उघडकीस येत आहेत. 

दरम्यान, आता बीडच्या परळी तालुक्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. धारूर तालुक्यातील सोनीमोहा येथील भरत चंद्रकांत तोंडे या अग्नीवीर जवानाने लग्नाचे आमिष दाखवून एका 24 वर्षीय तरुणीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी भरत तोंडे याच्यासह त्याच्या कुटुंबातील 7 सदस्यांविरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, लग्न ठरल्यानंतर भरत तोंडे याने तिचा विश्वास संपादन करून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर दोन्ही कुटुंबांकडून लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली होती. लग्नाची तयारी पूर्ण झाली असतानाच भरत तोंडे याने कॉल करून लग्नास नकार दिला आणि धमक्या दिल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

धक्कादायक म्हणजे आरोपी भरत तोंडे याने तरुणीच्या आई- वडिलांशी बोलणे करून पीडितेचा विश्वास संपादन केला. 20 डिसेंबर 2025 रोजी अग्नीवीर असलेला भरत तोंडे पीडितेच्या गावी गेला. तुला माझ्या आई, वडिलांनी अर्जंट भेटायला बोलावलं आहे, असे म्हणून पीडितेला दुचाकीवर बसवून वडवणीच्या पुढे थोड्या अंतरावर असलेल्या एका लॉजवर नेलं. आपण लग्न करणार आहोत असे सांगून भरत तोंडे याने आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. त्यानंतर दोघांच्याही कुटुंबियांनी 6 मे 2026 ही लग्नाची तारीख निश्चित केली. लग्नाची तारीख जवळ आल्याने बस्ता बांधला गेला, पत्रिका छापल्या मात्र 21 एप्रिल 2026 रोजी भरत तोंडे याने पीडितेला फोन करुन मला तुझ्याशी लग्न करायचे नाही, काय करायचे ते कर असे सांगितले. एवढेच नव्हे तर मला फोन करुन त्रास दिल्यास तुला जगू देणार नाही अशी धमकी दिली असल्याचे ही फिर्यादीत सांगण्यात आले आहे.

या प्रकरणी फसवणूक, धमकी आणि लैंगिक शोषणासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गुन्हा दाखल होऊन महिनाभर उलटल्यानंतरही आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप पीडितेकडून करण्यात येत आहे. राजकीय दबावामुळे कारवाईला विलंब होत असल्याचाही दावा पीडितेने केला आहे.रम्यान, न्याय मिळत नसल्याने आणि वारंवार पाठपुरावा करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप करत पीडित तरुणीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. या गंभीर प्रकरणात पोलिसांची पुढील भूमिका काय असणार आणि पीडितेला न्याय कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group