मोठी बातमी ! ''या'' तीन जिल्ह्यात काँग्रेसला सर्वात मोठं खिंडार
मोठी बातमी ! ''या'' तीन जिल्ह्यात काँग्रेसला सर्वात मोठं खिंडार
img
Nandini khandare More

राजकारणातील हालचालींना वेग आला असून आत्या काँग्रेस पक्षाच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. या अपडेट नुसार काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोंदिया, अकोला आणि बुलढाण्यात काँग्रेसला खिंडार पडलं आहे. तर हिंगोलीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं आहे. या ठिकाणचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपला मिळाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

सध्या गोंदिया/भंडारा विधान परिषदेचे वारे वाहत आहेत. यामध्ये अनेक पक्षाचे नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशातच गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील काँग्रेसचे एक जिल्हा परिषद सदस्य आणि दोन नगरसेवक हे भाजपाच्या गळाला लागले असल्याची विश्वासने सूत्राची माहिती आहे. आणि हे तिघेही भाजपा नगरसेवकांसोबत सहलीला गेले असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे गोंदिया- भंडाऱ्यात खळबळ उडाली आहे.

अकोल्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या दोन्ही पक्षांच्या मिळून 10 नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी नगरपंचायतमधील 4 काँग्रेसचे, 2 अजितदादा गटाचे आणि 4 अपक्ष नगरसेवकांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे. तर शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्या पुढाकारांने सर्वांचा काल मुंबईतील नंदनवन निवासस्थानी पक्षप्रवेश पार पडला.

बुलढाण्यात मोठी उलथापालथ

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरच्या राजकारणात मोठा राजकीय स्फोट झाला आहे.. काँग्रेसच्या 11 पैकी तब्बल 9 नगरसेवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगराध्यक्ष किशोर गारोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे नगरपालिकेत महाविकास आघाडीचे संख्याबळ आता 7 वरून 16 वर पोहोचले आहे, दरम्यान, महाविकास आघाडीकडे आता स्पष्ट बहुमत तयार झाले आहे. त्यामुळे नगरपालिकेतील विरोधी पक्ष शिंदे शिवसेनेला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

काँग्रेस नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन आपला पाठिंबा जाहीर केला आहे. मेहकर नगरपालिका निवडणूक झाली त्यावेळी दोन्ही शिवसेना आणि काँग्रेस वेगवेगळी लढली होती. यावेळी ठाकरे यांच्या शिवसेनेकडे नगराध्यक्ष पद मिळविले होते 7 नगरसेवक निवडून आले होते. यावेळी काँग्रेसला 11 नगरसेवक तर शिंदेसेनेला 9 नगरसेवक मिळाले होते. नगर पालिकेत सत्ता स्थापनेवेळी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे यांनी एकत्र येत आपला गट तयार करून उपाध्यक्ष, समित्या आपल्याकडे ठेवल्या होत्या.

मात्र आता सहा महिन्याच्या नंतर शहराचा विकास करण्यासाठी काँग्रेसचा गट फुटून नगरपालिका उपाध्यक्षासह 9 नगरसेवकांनी ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता मेहकरचे आमदार ठाकरे गटाचे, नगर पालिका ठाकरे गटाकडे, यामुळे मेहकरमध्ये ठाकरे यांच्या शिवनेचे वर्चस्व पहायला मिळत आहे. या घडामोडींमुळे मात्र मेहकरची चर्चा जिल्ह्यासह राज्यात होऊ लागली आहे. कारण केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे मेहकर होम टाऊन असून त्यांचाच आमदार तीन वेळा निवडून आलेला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group