मोठी बातमी ! अखेर उद्धव ठाकरेंची  शिवसेना फुटली; सहा खासदारांच्या गटाला मंजूरी
मोठी बातमी ! अखेर उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटली; सहा खासदारांच्या गटाला मंजूरी
img
Nandini khandare More


उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून एक मोठी बातमी समोर आली आहे . गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेली 'ऑपरेशन टायगर मोहीम' अखेर फत्ते झाली असून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ठाकरेसेनेतील फुटीर गटाला मान्यता दिली असून त्यामुळे शिंदे शिवसेनेत त्यांच्या विलिनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

 उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील फुटीवर अखेर शिक्कामोर्तब झाले. उद्धव ठाकरे यांच्या 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याविषयीचा अर्ज कालच लोकसभा अध्यक्षांकडे सादर केल्याची मोठी माहिती समोर आली. तर आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी उद्धव सेनेच्या सहा खासदारांच्या गटाला मंजूरी दिल्याची माहिती समोर आली आहे. तर खासदार संजय राऊत हे तातडीने लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांच्या भेटीला पोहचले आहेत. या गटाला मंजूरी देण्यापूर्वी उद्धव सेनेची बाजू ऐकून घेण्यासाठीची विनंती ते करणार असल्याचे समजते

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे उद्धव ठाकरे शिवसेनेच्या 6 खासदारांनी अगोदरच अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळावी याासाठी हा अर्ज करण्यात आला होता. ओम बिर्ला तातडीने काल रात्री दाखल झाले. तर उद्धव सेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी ओम बिर्ला यांना उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने चार पानी पत्र पाठवले होते. त्यात असा कोणताही स्वतंत्र गट स्थापन्यापूर्वी ,विलिनीकरणापूर्वी उद्धव सेनेची हरकत ग्राह्य धरण्याची विनंती करण्यात आली होती. पण बंडखोर खासदारांनी अगोदरच स्वतंत्र गटासाठी अर्ज केला होता. लोकसभा अध्यक्षांनी उद्धव सेनेच्या स्वतंत्र गटाला अगोदरच मंजूरी दिल्याने उद्धव सेनेचा उद्याच्या बैठकीसाठीचा व्हीपला किती महत्त्व उरलंय, असा सवाल केल्या जात आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group