आता एक मोठी बातमी समोर आली आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना मारहाण करण्यात आली आहे, जयपूरमधील आंदोलनावेळी ही घटना घडली आहे. आंदोलन सुरू असताना एका अज्ञात तरुणाने अचानक अभिजीत दीपके यांच्यावर हल्ला केला. ही घटना घडल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. दीपके यांना मारहाण करणाऱ्या अज्ञातांविरोधात आंदोलनस्थळी मोठा रोष पाहायला मिळाला. घटनास्थळी धावपळ उडाली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे.
भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सुनावणीदरम्यान तरुणांना झुरळाची उपमा दिल्याने अभिजीत दीपके यांनी संतप्त होऊन 'कॉक्रोच जनता पार्टी' ही व्यंगात्मक राजकीय चळवळ सुरू केली आली. सरकारविरोधात रोष व्यक्त करीत अमेरिकेतून दीपके यांनी चळवळ सुरू केली. कॉकरोच जनता पक्षाने समाजमाध्यमांवर अवघ्या काही दिवसांत कोट्यवधी फॉलोअर्स मिळवले. सुरुवातीच्या पाच दिवसांत कॉकरोच जनता पार्टीने इन्स्टाग्रामवर 100 लाख फॉलोअर्सचा आकडा पार केला होता. कॉकरोच जनता पार्टीने फॉलोअर्सच्या संख्येत भाजपलाही मागे टाकले. परंतु नंतर त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे अकाऊंट बॅन केले गेले.