संतापजनक ! हुंड्यासाठी आधी गर्भवतीचे हात गरम पाण्याने  जाळले अन नंतर टक्कल; कुठे घडली घटना ?
संतापजनक ! हुंड्यासाठी आधी गर्भवतीचे हात गरम पाण्याने जाळले अन नंतर टक्कल; कुठे घडली घटना ?
img
Nandini khandare More

राज्यात हुंडाबळीच्या अतिशय भयंकर आणि धक्कादायक घटना घडत आहेत. यातून महिलांचा छळ , हत्या मारहाण असे भयंकर प्रकार उघडकीस येत आहते. दरम्यान आता अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हुंड्यासाठी सासरच्या मंडळींनी एका गर्भवती विवाहितेचे गरम पाण्याने हात जाळले एवढचं नाही तर चक्क तिचे टक्कल केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही  घटना कल्याणमध्ये घडली आहे. 

हा छळ असह्य झाल्याने पीडित महिला सासरहून माहेरी पळून आली. सध्या तिच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण कल्याण आणि उल्हासनगर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अफसाना अन्सारी असे विवाहित महिलेचे नाव असून उल्हासनगरमध्ये राहायला आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये अफसानाचा विवाह वालधुनी परिसरात राहणाऱ्या समीन अन्सारीसोबत झाला. लग्न करतानाच अफसानाच्या आई- वडिलांनी आमची हुंडा देण्याची ऐपत नाही असे सांगितले होते. ही अट मान्य कर अन्सारी कुंटुबाने विवाह देखील केला. मात्र महिन्याभरातच हुंड्यासाठी छळ सुरू झाला. अफसानाला काही महिन्यातच दिवस गेले.

अफसाना गर्भवती असतानाही जेवण दिले नाही, घरातील जेवण लपवून ठेवले जायचे तसेच मारहाण करायचे, गरम पाण्याने हात-पाय जाळायचे, तिच्या गरजा पूर्ण करण्यासाठी देखील तिले पैसे अशा अनेक गोष्टी अफसाना सहन करत होची. माहेरची परिस्थिती चांगली नसल्याने अफसाना सगळं सहन सहा महिने करत होती. मात्र जून महिन्यात सासरच्यांनी छळाच्या क्रौर्याची परिसीमाच गाठल्या.अफसानाच्या डोक्यात उवा झाल्याचं सागत चक्क सासरच्यांनी तिचं टक्कल केलं.

सासरच्यांचा छळ असह्य झाल्याने अफसाना सासरच्या घरातून पळून बहिणीकडे गेली आणि तिने भावाला फोन केरत सहा महिन्यात कशाप्रकारे तिचा छळ झाला याची माहिती दिली. यानंतर तिचा भाऊ नीर हसन अन्सारी याने तिला तिला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलंय. क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या या प्रकरणाची आता मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी, आणि अफसानाच्या सासरच्यांवर अतिशय कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी अफसानाच्या भावाने केली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group