''त्या'' एका गोष्टीचा नाद नाडला !  कुटुंबाची हत्या करून मुख्यध्यापकाने स्वतःलाही संपवलं
''त्या'' एका गोष्टीचा नाद नाडला ! कुटुंबाची हत्या करून मुख्यध्यापकाने स्वतःलाही संपवलं
img
Nandini khandare More

आजकाल हत्या, आत्महत्यांचे प्रकार घडत असून ही बाब चिंताजनक बनली आहे. अशीच एक थरारक घटना आता सॊलापूरमधून समोर येत आहे. एका मुख्याध्यापकाने हसत्या खेळत्या कुटुंबाची हत्या करून स्वतःचेही आयुष्य संपविले आहे. ही घटना सॊलापूर येथे घडलीं असून  या घटनेनं जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.  

योगेश पाटील असं या आत्महत्या केलेल्या मुख्यध्यापकाचं नाव आहे, योगेश पाटील यांनी आधी पत्नी माधुरी पाटील, मुलं अथर्व आणि शिवांश पाटील यांची हत्या केली, त्यानंतर त्यांनी स्वत: देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.   

समोर आलेल्या माहितीनुसार योगेश पाटील यांनी आधी पत्नी माधुरी पाटील, मुलं अर्थव पाटील आणि शिवांश पाटील यांना विष दिलं, त्यानंतर त्यांनी स्वत: देखील आत्महत्या केली. 

बार्शी तालुक्यातील हत्तीज गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. योगेश पाटील हे नंदुरबार येथे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार योगेश पाटील यांना शेअर मार्केटचा नाद होता. त्यांनी शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. मात्र त्यांना शेअर मार्केटमध्ये सातत्याने नुकसान झालं. 

शेअर मार्केटमुळे त्यांच्या डोक्यावर तब्बल 1 कोटी 80 लाख रुपयांचं कर्ज झालं. याच कर्जाच्या विवंचनेतूनच त्यांनी संपूर्ण कुटुंब संपवलं आणि त्यानंतर स्वत: देखील आत्महत्या केली. दरम्यान, पोलिसांना घटनास्थळी 22 पानांची सुसाईड नोट मिळाली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group