सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी  घसरण ! ''इतक्या'' हजारांचा फरक
सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी घसरण ! ''इतक्या'' हजारांचा फरक
img
Nandini khandare More

सोने चांदीच्या दरात सातत्याने होणाऱ्या चढ उतार हिट असताना मात्र आता खरीद दारांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे
जर तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस हा खूप चांगला आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात विक्रमी घसरण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना प्रचंड आनंद झाला आहे. ज्यांना सोने खरेदी करण्याची इच्छा होती त्यांना खरेदी करण्याची संधी मिळाली आहे.

आज सोन्याच्या दारात तब्बल 4 हजार रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात तब्बल 11 हजार रुपयांनी घसरण झाले आहे. अमेरिका इराण यांच्यातल्या युद्धासंदर्भातल्या सुरू झालेल्या घडामोडीमुळे सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याची सराफ व्यावसायिक माहिती. 

10 ग्रॅम सोन्यासाठी आज जीएसटी सह 1 लाख 51 हजार 410 रुपये मोजावे लागणार आहेत. तर एक किलो चांदीसाठी  जीएसटी सह 2 लाख 45 हजार 140 रुपये द्यावे लागणार आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group