नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. भारतात टेलिग्राम अॅप बंद राहणार आहे. नीटचा पेपर टेलिग्रामवरुन फुटला होता. पुन्हा या गोष्टी होऊ नये म्हणून सरकारकडून खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
नीट परीक्षेआधीच टेलिग्रामवरुन पेपर फुटल्याने देशभरात खळबळ उडाली होती. त्यामुळे 3 मे रोजी झालेली नीट परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर NEET-UG 2026 फेर परीक्षा 21 जून रोजी होणार आहे. NEET-UG 2026 फेर परीक्षेआधी सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. Telegram बंदी घातली आहे. टेलीग्रामवर 22 जून पर्यंत बंदी असेल. मेसेज एडिट फीचर 30 जून पर्यंत बंद राहील.
मूळ परीक्षा रद्द झाल्यानंतर आता पुन्हा 21 जून रोजी पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेत कोणतीही गडबड होऊ नये यासाठी कडेकोट बंदोबस्त केला जात आहे. पेपर फुटणार नाहीत यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाची पाळमुळं महाराष्ट्रातही आहेत. पुणे, लातूर, नाशिकमधून विद्यार्थी आणि आरोपींना अटक करण्यात आली आहे.