संचिताच्या आत्महत्येचं नक्की कारण काय ? व्हॉट्सअप चॅट लीक; मोठा खुलासा
संचिताच्या आत्महत्येचं नक्की कारण काय ? व्हॉट्सअप चॅट लीक; मोठा खुलासा
img
Nandini khandare More

संचिता उगले या अभिनेत्रीने  राहत्या घरी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहे. दरम्यान तिचा मृत्यूवर अनेक दावे करण्यात येत आहेत. याचदरम्यान आता या अभिनेत्रीचं ? व्हॉट्सअप चॅट लीक झाले असून यातून आता मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. 

च्या मृत्यूमुळे संपूर्ण मनोरंजन विश्वास खळबळ उडाली आहे. तिने राहत्या घरी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहे. तिने इतकं टोकाचं पाऊल का उचललं, याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. आता तिचे व्हॉट्सअप चॅट लीक झाले आहेत, त्यातूनही मोठा खुलासा झाला आहे.

संचिताच्या मृत्यूनंतर तिचा भाऊ, मैत्रीण, सहकलाकार अशा कित्येक जणांनी तिच्या मृत्यूबाबत दावे केले आहेत. प्रत्येकाचे दावे वेगवेगळे आहेत.संचिताचा चुलत भाऊ आकाश उगलेनेही दावा केला आहे की, मनोरंजन क्षेत्रात तिला टार्गेट केलं जात होतं. त्याने या प्रकरणाची तुलना सुशांत सिंग राजपूत प्रकरणाशी केली आणि योग्य चौकशीची मागणी केली.

संचिताची जवळची मैत्रीण इंद्रक्षी कांजिलाल हिनेही आरोप केला आहे की संचिताला सेटवर समस्यांना सामोरं जावं लागत होतं. तिने संचिताचा सहअभिनेता उज्ज्वल शर्मावर गैरवर्तनाचा आरोप केला आणि दावा केला की दोघांमध्ये आर्थिक आणि कामाशी संबंधित मुद्द्यांवरून मतभेद होते.

संचिताची आणखी एक मैत्रीण अभिनेत्री मेघा शर्माने सांगितलं की, संचितावर कामाचा कोणताही दबाव नव्हता. तिच्यासाठी काम कधीच समस्या नव्हतं. इंडस्ट्रीतील दबाव हे तिच्या समस्यांचे मुख्य कारण नव्हतं. तिला इंडस्ट्रीकडून कोणत्याही दबावाला किंवा छळाला सामोरं जावं लागलं नाही. ती जानेवारीपासून नैराश्याने ग्रस्त होती.  तिला काही आरोग्याच्या समस्या होत्या.

संचिता मृत्यू प्रकरणात छळ आणि इंडस्ट्रीच्या दबावाचे आरोप समोर येत आहेत, तर मानसिक आरोग्य आणि वैयक्तिक समस्यांचाही उल्लेख केला जात आहे. याचदरम्यान संचिताचे व्हॉट्सअप चॅट लीक झाले आहेत. जे तिचे आणि सायकॉलिजस्ट डॉक्टरचे असल्याचं दिसतं.

या चॅट्समधून असं दिसून येतं की, संचिता तिच्या भविष्याबद्दल चिंतित आणि घाबरलेली होती. इतकंच नाही, तर तिला शूटिंगदरम्यान डायलॉग लक्षात ठेवण्यात अडचण येत होती. संचिता इतकी तणावाच होती की, तिला ती पूर्वीसारखा अभिनय करू शकत नाही, असं तिला वाटत होतं. अनेक महिने उपचार घेऊनही तिच्या स्थितीत कोणतीही सुधारणा होत नाही, हे तिने तिच्या डॉक्टरांना सांगितलं.  डॉक्टरांनी तिला खंबीर राहण्याचा सल्ला दिला.

संचिता उगलेच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्यापही स्पष्ट नाही. दरम्यान पोलिसांनी अपघाती मृत्यू अहवाल (ADR) दाखल केला असून तपास अधिकारी संचिता उगलेच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनासह तिच्या आयुष्याच्या सर्व पैलूंची चौकशी करत आहेत. पोलीस तपास पूर्ण झाल्यावरच कारण समोर येईल.

इतर बातम्या
Join Whatsapp Group