महागाईचा फटका ! CNGच्या दरात सलग तिसऱ्यांदा वाढ
महागाईचा फटका ! CNGच्या दरात सलग तिसऱ्यांदा वाढ
img
Nandini khandare More

इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार झाला. ज्यानंतर आता जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव घसरले. आता सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळण्याची शक्यता असतानाच मोठा दणका बसला आहे.

इराण आणि अमेरिका युद्धानंतर पेट्रोल-डिझेल, एलपीजी गॅस आणि सीएनजीच्या दर कमी होण्याचा अंदाज असतानाच मोठा दणका बसला. थेट तिसऱ्यांना सीएनजीच्या किमतीत वाढ करण्यात आली. प्रतिकिलो सीएनजीच्या किमतीमध्ये तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली. सीएनजीसाठी 95.75 रूपये मोजावे लागणार आहेत. 8 मे रोजी प्रतिकिलो दीड रूपयांनी वाढ सीएनजीच्या दरात करण्यात आली होती.

त्यानंतर 28 मे रोजी अडीच रूपयांनी वाढ झाली. घरगुती पीएनजीमध्येही 85 पैशांनी वाढ करण्यात आली. पीएनजीचा दर आता 51.50 रूपये झाला. पुणे, पिंपरी चिंचवड, तळेगाव, चाकण, हिंजवडी या भागात ही वाढ करण्यात आली. ज्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या ग्राहकांना मोठा दणका बसणार आहे. एकीकडे सामान्य लोक युद्धानंतर दरवाढ कमी होण्याची अपेक्षा करत आहेत, तर दुसरीकडे मोठा दणका बसत आहे.

महागाईचे चटके सहन करणाऱ्या पुणेकरांना नैसर्गिक वायू दरवाढीचा फटका बसणार आहे. पुणे परिसरात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी)च्या दरात 1 रुपयाची आणि घरगुती पाईप नॅचरल गॅस पीएनजीच्या दरात 85 पैशांची वाढ झाली. त्यामुळे वाहन चालकांना आता सीएनजीसाठी प्रति किलो 95 रुपये 75 पैसे तर घरगुती ग्राहकांना पीएनजीसाठी प्रति मानक घनमीटर 51 रुपये 50 पैसे मोजावे लागणार आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group