सोने खरिददारांसाठी एक खुशखबर आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांना न परवडणाऱ्या सोन्याच्या दरात चांगलीच घसरण झाली आहे. आता आलेल्या अपडेट नुसार जवळपास 400 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीचे दर 4 हजार रुपयांनी घसरले आहेत.
तेल, इंधनांचे दर, सोने आणि चांदी यांच्या किंमती तर आकाशाला स्पर्श करताना सोन्याचे दर आज चांगलेच घसरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांना न परवडणाऱ्या सोन्याच्या दरात जवळपास 400 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीचे दर 4 हजार रुपयांनी घसरले आहेत.
आज 17 जून रोजी जळगावच्या सराफ बाजारात 10 ग्रॅम सोन्यासाठी जीएसटीसह 1 लाख 54 हजार 500 मोजावे लागणार आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये सतत वाढत असलेले चांदीचे दर हे चांगलेच घसरले आहेत.