लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार ! शेतात उचलून नेलं अन ...
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार ! शेतात उचलून नेलं अन ...
img
Nandini khandare More
राज्यात महिला सुरक्षिततेच प्रश्न ऐरणीवर असून महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. दरम्यान आता बीडमधील केज तालुक्यातून धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

लग्नाचे आमिष दाखवून शेतात उचलून नेत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आले. नराधम ट्रॅक्टर चालकाच्या विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून ज्ञानेश्वर बाजीराव ठोंबरे (रा. दरडवाडी) असे आरोपीचे नाव आहे.

पीडित मुलगी ही कुटुंबासह गावात राहते. 2 जून रोजी रात्री साडेअकरा वाजता ती घराबाहेर पडली असता, समोरून आलेल्या ट्रॅक्टर चालकाने तिला एकटं गाठलं. ट्रॅक्टर थांबवून बळजबरीने रस्त्याच्या कडेला असणाऱ्या शेतात नेले. लग्नाचे आमिष दाखवून देखील तिने नकार दिल्याने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. नवविवाहितेच्या पोटात दुखत होतं, डॉक्टरांकडे नेताच भयंकर प्रकार समोर, पतीसह आई-वडिलांवर गुन्हा

पीडित मुलीने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने तिच्या तोंडाला रुमाल घट्ट बांधला. दोन्ही हात दोरीने बांधून तिच्यावर पाशवी अत्याचार केले. तसेच “घडलेला प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे मारून टाकीन,” अशी धमकी देऊन आरोपी तिथून पसार झाला. त्यानंतर पीडितेने स्वत:ची सुटका करून घेत घर गाठले. पीडिता घाबरलेली असल्याने तिने सुरुवातीला कुटुंबीयांना सांगितले नाही. मात्र, 13 जून रोजी तिने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला.

पीडितेने कुटुंबीयांना माहिती देताच त्यांनी केज पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार ट्रॅक्टर चालक ज्ञानेश्वर बाजीराव ठोंबरे याच्याविरोधात बलात्कार आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण कीर्तने हे अधिक तपास करत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group