सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून उद्धव ठाकरे गटात मोठा भूकंप आलेला असून 6 खासदारांनी शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केली आहे.याचदरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे, 6 खासदारांनी शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केली आहे. हे सर्व खासदार एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. थोड्याच वेळात त्यांचा शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , या सर्व घडामोडी घडत असतानाच आज उद्धव ठाकरे यांनी आमदारांची बैठक बोलावली होती, मात्र या बैठकीला तीन आमदार अनुपस्थित असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.