ओमराजे निंबाळकर यांच्याबाबत पोलिसांनी घेतला ''हा'' मोठा निर्णय !
ओमराजे निंबाळकर यांच्याबाबत पोलिसांनी घेतला ''हा'' मोठा निर्णय !
img
Nandini khandare More

शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. या बंडखोरीमुळे मोठे राजकीय भूकंप झाले असून आता राजकारणात विविध घडामोडींना वेग आलं आहे याच दरम्यान आता ओमराजे निंबाळकर यांच्याबाबत एक अपडेट समोर आली आहे. 

बंडखोरी केलेल्या खासदारांपैकी ओमराजे निंबाळकर सोडले तर इतर सर्व खासदारांना अज्ञातस्थळी हालवण्यात आले. हे खासदार दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये असल्याचे सांगितले जात होते. ओमराजे निंबाळकर यांनी देखील शिवसेना पक्षातून मोठी बंडखोरी केली. पण त्यांच्या वडिलांच्या केसचा निकाल असल्याने त्यांनी पुणे सोडले नाही. मुंबईमध्ये पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडाचा निकाल लागला. हा निकाल ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात लागला. 

मात्र, ज्यावेळी ओमराजे निंबाळकर आपल्या कुटुंबासोबत कोर्टात होते, त्यावेळी शिवसैनिक ठाकरे गट कोर्टाबाहेर गर्दी करत होता. काही काळ तणावाचे वातावरण होते. हेच नाही तर मुंबईहून पुण्यात परतल्यानंतरही ओमराजे निंबाळकर यांच्या घराबाहेर ठाकरेंचे शिवसैनिक जमले होते.

पोलिसांनी मोठा निर्णय घेत थेट ओमराजे निंबाळकर यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली. त्यांच्या धाराशिव येथील निवासस्थानी सुरक्षा वाढवली. यादरम्यानच आता सरकारने मोठा निर्णय घेत ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी पुढील आठवडाभर सुरक्षा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. बंदोबस्त वाढवण्याबाबत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सूचना दिल्या. दिवसा एक अधिकारी आणि 5 पोलिस कर्मचारी तैनात असणार आहेत.

6 बंडखोरी केलेल्या खासदारांना सुरक्षा पुरवण्यात आली. शिवसेना ठाकरे गटाकडून ऑपरेशन तुडवन्याची धमकी देण्यात आली. याला या खासदारांनी उत्तर दिले आहे. ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केली. पण ते आपल्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधूनच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असल्याचे जाहीर केले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group