केतन अग्रवाल प्रकरणात हादरवून टाकणारा  मोठा खुलासा ! दरीत कोसळून मृत्यू की कट ?
केतन अग्रवाल प्रकरणात हादरवून टाकणारा मोठा खुलासा ! दरीत कोसळून मृत्यू की कट ?
img
Nandini khandare More

गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारीच्या प्रमाणात चिंताजनक आधी होत असून आपल्या विकृत गुन्ह्यांना अंजाम देण्यासाठी गुन्हेगार विचारांच्या पलीकडे असणाऱ्या  पद्धतीचा अवलंब करतात. अशीच एक धक्कादायक घटना गेल्या आठवड्यात घडली आहे. कुटुंबीय, होणारी पत्नी आणि मित्रांसह लोहगजावर फिरायला गेलेल्या केतन अग्रवाल हा तरूण पाय घसरून शेकडो फूट दरीत कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. गेल्या आठवड्यात घडलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ माजली.  दरम्यान आता या घटनेचा मोठा आणि धक्कदायक खुलासा समोर आला आहे. 

केतनच्या भावी पत्नीच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच त्याचा मृत्यूमुळे सर्वांनाच धक्का बसला. त्यांच्या कुटुंबियांवर तर शोककळा पसरली. मात्र याच केसला आता एक धक्कादायक वळण मिळालं आहे. कारण केतनाच मृत्यू हा अपगाती नसून त्याची हत्या करण्यात आल्याचं उघड झालं आहे. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे, त्याची मारेकरी दुसरी तिसरी कोणी नसून त्याची अतिशय जवळची व्यक्तीच होती. हो, त्याच्या होणाऱ्य पत्नीनेच मित्रासह मिळून केतनची हत्या केल्याचे अतिशय धक्कादायक सत्य उघडकीस आलं आहे. यामुळे तर अक्षरश: खळबळ माजली असून पोलिसांनी या प्रकरणी सिया गोयल आणि तिच्या मित्राला ताब्यात घेतलं आहे,

केतन हा पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांचा मुलगा होता. त्याचं सिया गोयल हिच्याशी लग्न ठरलं होतं. त्यासाठी मोठ्या उत्साहात आणि आनंदाने तयारी सुरू होती. लग्नाचा थाटच वेगळा होता. विविहासाठी जयपूरमधला खासपॅले बूक करण्यात आला होता, येणाऱ्या पाहुण्यांसाठी खास दोन खासगी विमानांचीही व्यवस्था करण्यात आली होती. मात्र लग्नापूर्वी काही महिने आधीच केतनचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगरच कोसळला.

गेल्या आठवड्यात , 19 जून रोजी केतनच्या होणाऱ्या बायकोचा वाढदिवस होता., त्यानिमित्ताने सर्व कुटुंबीय, मित्र असे दोन तीन दिवस फिरायला बाहेर पडले होते. सियाच्या वाढदिवसासाठी केतनने खूप तयारी केली होती. महाबळेश्वरमध्ये तिचा वाढदिवस मस्तपैकी सेलिब्रेट करण्याचा त्याचा प्लान होता. त्याच्या आदल्या दिवशीच तो कुटुंबीय आणि मित्रांसोबत लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेला होता. मात्र तिथेच त्याचा घात झाला आणि जीव गेला.

या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलीस, ‘शिवदुर्ग मित्र लोणावळा’ आणि ‘मावळ वन्यजीव संरक्षण संस्था’ यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं. खडतर भूभागात राबवलेल्या आव्हानात्मक बचावकार्यानंतर केतनचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला. मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

या घटनेसंदर्भात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती, मात्र पोलिसांनी तपास सुरू केल्यावर त्यांना अनेक त्रुटी आढळल्याने त्यांचा संशय वाढला आणि तपासाची तक्र वेगाने फिरू लागली. पोलिसांनी तांत्रिक तपासाचा आधार घेतला. केतन नेमका कसा पडला हे शोधणं सुरू झालं. 

त्या दरम्यान पोलिसांनी लोहगडावरील सीसीटीव्ही फुटेज तपासलं. तेव्हा एका तरूणाच्या हालचालींचा त्यांना संशय आला. गेल्या आठवड्यात प्रचंड उकाडा होता, ऊन होतं, तरीही तो तरूण भर उन्हात मोठ हुडी घालून वावरत होता. कानात घातलेले हेडफोन आणि हुडीने चेहरा झाकण्याचा त्याचा प्रयत्न पोलिसांना दिसल्याने त्यांचा संशय बळावला. त्ायंनी आणखी खोलात जाऊन तपास केल्यावर त्याच तरूणाने केतनाल ढकलल्याचं समोर आलं आणि हत्येचं हे गूढ उकललं.

सियानेच काढला केतनचा काटा

पाय घसरून तदरीत कोसळल्याने केतनचा जीव गेला असं सर्वांनाच वाटत होतं, या अपघाती मृत्यूमुळे सगळचे हळहळले. मात्र पोलिसांनी या घटनेचा तपास केल्यावर वेगळचं सत्य समोर आल्याने सगळेच हादरले. केतनचा पाय घसरला नलव्हता तर त्याची होणारी पत्नी सिया हिने तिच्या मित्रासह मिळून त्याचा काटा काढला. लोहगडावर फिरत असताना आजूबाजूला कोणी नाही हे पाहून, संधी साधून सियाने तिच्या मित्राच्या मदतीने केतनला दरीत ढकलून दिलं. 400 फूट खोल दीरत कोसळल्याने केतन गंभाीर जखमी झाला आणि त्याने अखेरचा श्वास घेतला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group