उद्धव ठाकरे गटाच्या सहा खासदारांच्या बंडखोरी नंतर राजकारणात मोठे राजकीय भूकंप झाले असून उद्धव ठाकरे याना मोठा झटका बसलेला आहे. या सहा खासदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशाचा जाहीर कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. मतदारसंघाचा विकास आणि विकासनिधी या कारणामुळेच आम्ही पक्षांतर करत आहोत, असे या सहा खासदारांकडून सांगण्यात आले होते.
दरम्यान, आता खासदारांनी प्रक्षप्रवेश करताच एकनाथ शिंदे यांनी या खासदारांना मोठं गिफ्ट दिल आहेते म्हणजे जे खासदार पक्षात आलेले आहेत, त्यांना भरघोस विकासनिधी दिला जाईल, असे शिंदे यांनी सांगितले आहे.
निधी देण्याची तत्काळ सूचना केली
आजच आम्ही काही विभागांचा निधी, निधीचे प्रस्ताव आणायला सांगितले आहे. काही निधी त्यांना तत्काळ देण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. मतदारसंघांचा विकास हाच आलेल्या खासदारांचा अजेंडा होता. या अजेंड्याला आम्ही आता सुरुवात केली आहे. एनडीएचीही ताकद वाढलेली आहे. डबल इंजिनच्या सरकारमध्ये हे सहा खासदार आले आहेत, असे म्हणत बंडखोरी केलेल्या खासदारांना आता विकासनिधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल, असे शिंदे यांनी सांगितले.