पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले असून या प्रकरणाचे आणखी धागे दोरे असून आता एका मागून एक धक्कादायक खुलासे होत आहेत. यादरम्यान मोठी माहिती पुढे येत आहे. केतन बोलताना अडखळायचा ते सियाला प्रचंड खटकले होते. तिला त्यावरून तक्रार होती, त्याच्या काही गोष्टी तिला आवडत नव्हत्या.
त्यामध्येच प्रियकराच्या मदतीने त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. दोन वेळा केतन याला मारण्याचा प्रयत्न सिया हिच्याकडून करण्यात आला. मात्र, तिला यश मिळाले नाही. परत सियाने केतनला थेट लोहगडावर नेले. लोहगडावरून त्याला ढकलण्याकरिता यावेळी चेतन देखील उपस्थित होता. फक्त बोलताना केतन अडखळायचा यामुळे तिला त्याच्यासोबत लग्न करायचे नव्हते.
दरम्यान , सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चाैधरी हे दोघेही जेलमध्ये आहेत. पोलिस त्यांच्याकडून कसून चाैकशी करत आहे.