केतन हत्याप्रकरण :  केतनला नक्की धक्का कुणी दिला? सिया कि तिचा बॉयफ्रेंड ?
केतन हत्याप्रकरण : केतनला नक्की धक्का कुणी दिला? सिया कि तिचा बॉयफ्रेंड ?
img
Nandini khandare More

लग्नाला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच होणाऱ्या पत्नीनेच केतनच्या हत्येचा भयानक कट रचला असल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाने खळबळ निर्माण झाली असून या प्रकरणात अजूनही गूढ लपले आहेत. 

केतन अग्रवालच्या हत्येप्रकरणी आरोपींना पोलिसांनी पकडलं आहे. या प्रकरणात केतनची होणारी बायकोच मुख्य आरोपी निघाली आहे. तिच्या बॉयफ्रेंडने आणि तिने मिळून केतनची हत्या केल्याचं समोर आलं आहे. मात्र, दोघांनी मिळून केतनची हत्या केली असली तरी नेमका केतनला धक्का कुणी दिला? यांच गूढ अद्याप कायम आहे. पोलिसांनाही त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. केतनच्या जवळ सिया होती म्हणून तिने धक्का दिला की त्या परिसरात असलेल्या चेतन चौधरीने धक्का दिला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे केतनचा मुख्य मारेकरी कोण? असा सवाल निर्माण झाला आहे.

पुणे SP (ग्रामीण) संदीप सिंग गिल यांनी काल पत्रकार परिषद घेऊन केतन अग्रवालच्या हत्येप्रकरणी माहिती दिली. यावेळी त्यांनी खून कसा झाला? खूनाचा कट आधीपासून कसा रचला गेला? किती वेळा केतनला मारण्याचा प्रयत्न केला गेला आदी माहिती दिली. मात्र, केतनला सिया गोयल की चेतन चौधरी या पैकी कुणी धक्का दिला याची माहिती पोलिसांनी दिली नाही. केतनला धक्का कुणी दिला हे अद्याप स्पष्ट नाही. तपासात सर्वकाही समोर येईल. पण केतनला मारायचा प्लान ठरला होता. 18 तारखेला ही घटना घडली. त्या आधी एक आठवडा सिया आणि चेतनचा प्लान ठरला असेल, असं संदीप सिंग गिल यांनी सांगितलं.

या प्रकरणातील दुसरा आरोपी चेतन चौधरी आम्हाला लोहगड किल्ल्यावर काही ठिकाणी दिसला. त्यामुळे आम्हाला त्याचा संशय आला. हा अपघात नसून घातपात असल्याचा आम्हाला संशय आला. त्यानुसार आम्ही तपास सुरू केला, अशी माहिती संदीप सिंग गिल यांनी दिली.

एकाच ठिकाणी व्यवसाय

सियाने एक व्यवसाय सुरू केला होता. चेतन चौधरीनेही मार्केट यार्डमध्ये बिझनेस सुरू केला होता. चेतन होलसेलचं काम करत होता. सिया गोयलच्या कुटुंबाचाही तिथेच बिझनेस आहे. एक वर्षापासून सिया आणि चेतनची सलगी वाढली होती, असंही त्यांनी सांगितलं.

लोहगड किल्ल्यावर केतन आणि सियाची तिसरी व्हिजिट होती. 14 तारखेलाही दोघे तिथे गेले होते, अशी माहितीही त्यांनी दिली. बालीला जाताना सिया गोयलनेच त्याचा पासपोर्ट काढून घेतला. तिला बालीला जायचं नव्हतं. 19 तारखेला वाढदिवस साजरा करायचा होता. पण तिला केतन बरोबर वाढदिवस साजरा करायचा नव्हता. त्यामुळे तिने 18 तारखेला ट्रेकिंगला जायचा प्लान रचला, असं सांगितलं.

इतर बातम्या
Join Whatsapp Group