नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करणार्या पतीचा काटा पत्नीनेच काढल्याची घटना गंगापूर रोड परिसरात घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की संतोष भुराळी कोल (वय 37, रा. श्री गुरुजी हॉस्पिटलमागे, गंगापूर रोड) हा मजुरीचे काम करायचा. त्याला दारू पिण्याची सवय असल्याने तो नेहमी दारू पिऊन पत्नीला त्रास द्यायचा. तिच्या चारित्र्यावर वेळोवेळी संशय घेत असल्याने त्यांच्यात वाद व्हायचे. अनेक वेळा तो पत्नीला मारहाणदेखील करायचा.
पतीच्या या त्रासाला कंटाळल्याने पत्नीने ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून त्याला जिवे ठार मारले. पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली असून, तिच्याविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत.