गाडीला धक्का का दिला अशी विचारणा केली असता कल्पेश अभिमन्यू पवार या तरुणाला एक टोळक्याकडून बेदम मारहाण केली असल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या सातपूर येथील अशोक नगर परिसरात घडलं आहे. तसेच तरुणाला शिवीगाळ व धक्काबुक्की केली व फिर्यादीच्या भावाला ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या इतर साथीदार यांना बोलावुन दगड डोक्यात मारून गंभीर जखमी केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार साहील मनोज यादव. पापुरस उर्फ मॅडी सोनवणे.देवेंद्र रविंद चव्हाण.हर्षल उर्फ साई देविदास पगार.प्रशांत बरू, कुणाल रविंद्र सोनवणे, तुफान शेख,गौरव चौधरी आणि अनिरूध्द असे या संशयितांची नवे आहेत.
दरम्यान , कल्पेश अभिमन्यू पवार याचा भाऊ व त्याचा मित्र गणेश पवार हे भांडण सोडवित असतांना त्यांना हाताचापटीने मारहाण करून जाताना जीवे मारण्याची धमकी देत तेथून पळून गेले दरम्यान घटनेननंतर परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब दहिफळे करीत आहे.