''या'' शहरात काँग्रेसला मोठा धक्का ! बड्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश
''या'' शहरात काँग्रेसला मोठा धक्का ! बड्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश
img
नंदिनी मोरे
राज्यातील घडामोडींना वेग आला असून राजकीय  वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांना धक्क्यांवर धक्के बसत आहे. त्यातच आता अकोला शहरातील काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अकोला महानगरपालिकेचे माजी महापौर मदन भरगड यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात अधिकृतपणे प्रवेश केला. 

विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांच्या उपस्थितीत मदन भरगड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने अकोल्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर मदन भरगड यांचे हे पक्षांतर काँग्रेससाठी निश्चितच चिंतेची बाब ठरली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group