नाशिकमध्ये अवैद्यरित्या वास्तव्य करणाऱ्या ४ बांग्लादेशी महिला व त्यांना बनावट ओळखपत्रे तयार करून देणाऱ्या एजंन्टला गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने अटक केली आहे.
पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी नाशिक शहरात अवैद्यरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी इसमांचा शोध घेवून कार्यवाही करण्याबाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगाने पोलीस उप आयुक्त (गुन्हे), सहा.पो. आयुक्त, गुन्हे शाखा, यांनी सुचना दिलेल्या होत्या.
त्या अनुषंगाने अंबड पोलीस स्टेशन कडील सपोनि प्रताप गिरी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, खैरेमळा लक्ष्मीनगर येथे काही बंगलादेशी महिला अवैध कागदपत्राशिवाय वास्तव्यास आहेत. ही बातमी वपोनि मधुकर कड यांना कळविले. त्या अनुषंगाने वरीष्ठ पोलीस निरीक्षक मधूकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करण्यात आली. त्यात अंबड पोलीस ठाणे कडील सपोनि प्रताप गिरी, मपोउपनि सविता उंडे व गुन्हे शाखेकडील पोउपनि चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे यांनी आज खैरेमळा लक्ष्मीनगर, साईनगर, अमृतधाम, पंचवटी येथे छापा मारला असता या ठिकाणी चार बांग्लादेशी महिला या कोणत्याही वैध कागदपत्राशिवाय भारत बांग्लादेश सिमेवरील मुलकी अधिका-याच्या लेखी परवानगी शिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करून नाशिक येथील खैरेमळा लक्ष्मीनगर, साईनगर अमृतधाम पंचवटी नाशिक येथे अवैधरित्या वास्तव्य करीत असतांना मिळून आल्या आहेत.
तसेच त्यांच्याकडे भारतीय नागरीकत्वाची खोटी व बनावट आधारकार्ड सारखी कागदपत्रे मिळुन आली. त्याबाबत त्यांच्याकडे अधिक विचारपुस केली असता त्यांनी सदरची कागदपत्रे ही त्यांना नवजीत भवन दास, (वय ३८, रा खैरेमळा लक्ष्मीनगर, साईनगर अमृतधाम पंचवटी नाशिक), जगदीश मिस्तरी (रा-आराजंग, सुरत) व २ बांग्लादेश येथील इसम यांनी वेगवेगळया राज्यामध्ये बनवुन दिल्याचे सांगितले. माईशा हाबिब शेख (वय २२, मुळ रा-बोरीशन, नागोर, पिरोपुर बांगलादेश), निशान मिहिर शेख, (वय २१, रा.अलिपुर, परितपुर, थाना कोतवाली, जिल्हा परितपुर, बांगलादेश), झुमूर हसन शेख, (वय ३३, रा. शिदीपाशा थाना अभयनागोर, जिल्हा जोशीर, बांग्लादेश), रिहाना जलील गाझी (वय ३०, रा. थाना मरूडगंडा, जिल्हा बागीरहट, गाव चंडीपूर, राज्य खुलणा, बांग्लादेश) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत.
ही कामगीरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, किरकुमार चव्हाण, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा संदिप मिटके, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, अंबड पोलीस स्टेशन कडील सपोनि प्रताप गिरी, मपोउनि सविता उंडे, पोअं पवार, पोउनि चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, पोउनि किरण शिरसाठ, पोहवा प्रविण वाघमारे, प्रदिप म्हसदे, संदिप भांड, योगीराज गायकवाड, उत्तम पवार, महेश साळुंके, नाझीमखान पठाण, रोहिदास लिलके, मिलींदसिंग परदेशी, विशाल देवरे, सुकाम पवार, पोअं समाधान पवार, गोरक्ष साबळे, राहुल पालखेडे, मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे, आप्पा पानवळ, मपोहवा शर्मिला कोकणी, मपोअं मनिषा सरोदे, अनुजा येलवे यांनी केली आहे.