अमेरिकेला मोठा धक्का !  इराणने केली ''ही'' घोषणा
अमेरिकेला मोठा धक्का ! इराणने केली ''ही'' घोषणा
img
DB

एक मोठी बातमी समोर येत आहे. इराणने अमेरिकेला धक्का देत एक मोठी घोषणा केली असल्याची माहिती समोर येत आहे. इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे. या पार्श्वभूमीवर इराणने अमेरिकेसोबत सुरू असलेल्या अणू चर्चेतून माघार घेत असल्याची औपचारिक घोषणा केली आहे. 

दरम्यान, इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू असलेल्या  युद्धामुळे मध्य पूर्वेमधील तणाव पीक पॉइंटला पोहोचला आहे. इस्रायलकडून इराणची राजधानी तेहरानवर करण्यात आलेल्या एअरस्ट्राईकमध्ये आतापर्यंत 78 लोकांचा मृत्यू झाला असून, 329 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. याबाबत इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांकडून माहिती देण्यात आली आहे. इस्रायलकडून पाच टप्प्यांमध्ये इराणवर हल्ला करण्यात आला. इराणमधील अनेक महत्त्वाची ठिकाणं या हल्ल्यामध्ये इस्रायलने टार्गेट केली. या हल्ल्यामध्ये इराणच्या अनेक महत्त्वाच्या सैन्य अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

या हल्ल्यासंदर्भात माहिती देताना इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आम्ही एअर स्ट्राईकची तयारी आधीपासूनच केली होती. त्यासाठी लागणारी शस्त्र आणि ड्रोन यांना आधीच त्या ठिकाणी पोहोचवण्यात आलं होतं. योग्य वेळ येताच आम्ही एअर स्ट्राईक केला. रॉयटर्सच्या एका रिपोर्टनुसार इस्रायलच्या या हल्ल्यामध्ये इराणचे वीस वरिष्ठ कमांडर मारले गेले आहेत. या हल्ल्यामध्ये इराणचं मोठं नुकसान झालं आहे. इराणच्या सरकारी रिपोर्टनुसार या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 78 लोकांचा मृत्यू झाला असून, 329 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत.

इराणची राजधानी तेहरानवर झालेल्या हल्ल्यानंतर आता इराणनं आक्रमक भूमिका घेतली आहे. इराणने अमेरिकेसोबत सुरू असलेल्या अणू चर्चेतून माघार घेत असल्याची औपचारिक घोषणा केली आहे. या संदर्भात इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीनं एक निवेदन जारी करण्यात आलं आहे, ज्यामध्ये म्हटलं आहे की, अशा आक्रमक आणि चिथावणीखोर कृत्यानंतर या चर्चेला कोणताही आधार उरलेला नाहीये, तर दुसरीकडे या संदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, जर इराणला तडजोड करायची असेल तर त्यांच्याकडे आणखी एक संधी आहे.

त्यामुळे आता तणाव आणखी वाढण्याची शक्यात आहे. इस्रायलने केलेल्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देऊ असा इशारा इराणने इस्रायला दिला आहे. तसेच अमेरिकेसोबत सुरू असलेली अणू चर्चा देखील स्थगित केली आहे. यावर अमेरिकेनं देखील प्रतिक्रिया दिली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group