अहमदाबाद येथे विमानाचा भीषण अपघात झाला असल्याची अतिशय धक्क्कादायक घटना घडली आहे.एअर इंडियाचे B-787 हे विमान अहमदाबादहून लंडनला निघाले होते. या घटनेंन संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या विमानात 242 प्रवासी प्रवास करत होते. यातील बऱ्याच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आता याच अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार याच विमानात विजय रुपाणी हेदेखील प्रवास करत होते. त्यांचा विमानातील एक फोटोदेखील समोर आला आहे. विमानात बसलेल्या एका प्रवाशाने हा फोटो काढला होता. मात्र हे विमान क्रॅश झाल्यानंतर या दुर्घटनेत विजय रुपाणी यांचा मृत्यू झाला आहे. खासदार परिमल नाथवानी यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक ट्विट केलं आहे. त्यांनी आपल्या या ट्विटमध्ये विजय रुपाणी यांचं दुखद निधन झाल्याची माहिती देत दु:ख व्यक्त केलं आहे.