मला मुली खूप आवडतात ,  500 हुन अधिक मुलींसोबत संबंध..., ''या'' क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा
मला मुली खूप आवडतात , 500 हुन अधिक मुलींसोबत संबंध..., ''या'' क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा
img
नंदिनी मोरे
  क्रिकेट जगतात नेहमीच चर्चेचे  अनेक घटना  घडतात तसेच एखाद्या खेळाडूचे वक्तव्य याने चर्चेचा विषय असतो. दरम्यान, आता एका  खेळाडूने  खळबळजनका दावा केला आहे. मी जगभरातील 500 ते 650 मुलींसोबत शारीरिक संबंध ठेवले आहेत,असे खळबळजनक विधान क्रिकेटपटूने केले आहे.

हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून टीनो बेस्ट आहे. या खेळाडूने वेस्ट इंडिजसाठी 26 टेस्ट आणि 25 वनडे सामने खेळले आहेत. या खेळाडूने कोणत्याही मोठ्या स्पर्धेत भाग घेतलेला नाही आहे. त्यामुळे टीनो बेस्टला फारसं कुणी ओळखत नाही आहे. आता याच टीनोचं माइंड द विंडोज माय स्टोरी हे आत्मचरित्र प्रसिद्ध झालं आहे.या आत्मचरित्रात त्याने अनेक खुलासे केले आहेत.

मला मुली खूप आवडतात आणि मी सुद्धा मुलींना खूप आवडतो. मला वाटतं मी जगातला सर्वांत सुंदर टकला माणूस आहे. एक क्रिकेटर म्हणून मी जिथे कुठेही गेलो, मी अनेक मुलींशी बोललो, अनेक मुलींना मी डेट केलं आणि या मुलींसोबत झोपलो देखील. मला वाटतं मी जगभरातील 500 ते 650 मुलींसोबत शारीरिक संबंध ठेवले आहेत, असा दावा टीनोने त्याच्या आत्मचरीत्रात केला आहे.

टीनोने त्याच्या आत्मचरित्रात पत्नी आणि मुलीबद्दलही लिहिले आहे.माझी पहिली प्रेयसी मेलिसा हिच्यासोबत तामानी नावाची एक सुंदर मुलगी होती.पण आमच्यासोबत परिस्थिती वाईट झाली. मुलांनी मला सांगितले की एकदा मी बार्बाडोससाठी विकेट घेतल्या की ती माझ्यासाठी परत येईल. मी तसे केले, पण ती आली नाही.

टीनो पुढे म्हणतो, माझी जेव्हा बायको आली नाही तेव्हा मी थोडा प्लेबॉय बनलो. मी एक पुरुष वेश्या बनलो होतो. जर मला एखादी मुलगी आवडली तर मी तिच्याशी बोलायचो. मग ती कोणही असो.मला कोणाला डेट करायचं आहे ते मी ठरवायचो. मी आठवड्यातून पाच किंवा सहा वेळा डेटवर जायचो,यावेळी प्रत्येक वेळी माझ्यासोबक वेगवेगळ्या मुली असायच्या.

एक दिवस एक, दुसऱ्या दिवशी दुसरा. मी तरुण होतो आणि मला जीवनशैली खूप आवडायची. सर्वात सुंदर मुली ऑस्ट्रेलियन असतात. मला वाटते की त्या अद्भुत असतात. त्या खरोखरच त्यांच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करतात आणि त्यांचे शरीर अद्भुत असते, असे टीनो सांगतो.


दरम्यान , इंटरनॅशनल मास्टर्स लीग 2025 मध्ये खेळताना टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंह आणि टिनो बेस्ट यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली होती. फायनल लढतीत वेस्ट इंडिज मास्टर्सचा सामना इंडिया मास्टर्ससोबत झाला होता. या लढतीत टिनो बेस्ट आणि युवराज सिंह यांच्यात बाचाबाची झाली होती. त्यानंतर अखेर ब्रायन लाराला मध्यस्थी करावी लागली होती.
इतर बातम्या
Join Whatsapp Group