जिल्ह्यातील अकरा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाच अधिकारी प्रतीक्षा यादीत
जिल्ह्यातील अकरा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाच अधिकारी प्रतीक्षा यादीत
img
नंदिनी मोरे
नाशिक - नाशिक जिल्ह्यातील 11 पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी काढले आहेत. यामध्ये पाच पोलीस निरीक्षकांना कोणतीही नियुक्ती दिली नसून त्यांच्या नियुक्तीचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत. 

नाशिक पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार घेतल्यानंतर जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रांमध्ये सातत्याने दौरे करून माहिती घेणाऱ्या पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी आज रात्री उशिरा जिल्ह्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये सर्व बदल्या करण्यात आलेले अधिकारी हे पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी असून एक प्रकारे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यामध्ये पोलीस दलामध्ये भाकरी फिरवली आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. 

पोलीस खात्यामध्ये झालेल्या बदल्यांमध्ये सारिका अहिरराव यांची नियुक्त इगतपुरी पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आलेली आहे तर सुधीर पाटील यांची बदली मालेगाव मधील किल्ला पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे. राहुल खताळे यांची बदली पवारवाडी या मालेगाव मधील पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आलेली आहे. मृदुला नाईक यांची बदली नाशिक तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे विजय शिंदे यांची बदली घोटी पोलीस ठाणे मध्ये करण्यात आलेली आहे तर महेश कुलकर्णी यांची बदली त्रंबकेश्वर पोलीस ठाणे मध्ये करण्यात आली आहे. जिल्ह्यामधील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या देखील बदल्या करण्यात आलेल्या आहेत.

यामध्ये पुरुषोत्तम क्षीरसासाठ यांची बदली वडनेर खाकुर्डी येथे करण्यात आलेली आहे तर दगडू पाटील यांची बदली मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे. गायत्री जाधव यांची बदली वणी पोलीस ठाणे मध्ये करण्यात आलेली आहे तर राकेश परदेशी यांची बदली अभोणा पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आलेली आहे. सिद्धेश्वर आखेगावकर यांची बदली वडनेर भैरव पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आलेली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group