हृदयद्रावक !  4 दिवसांत दोन भावांचा दुर्दैवी  मृत्यू, नेमकं काय घडल ?
हृदयद्रावक ! 4 दिवसांत दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडल ?
img
नंदिनी मोरे
एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. 4 दिवसांत दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे.  लखनऊतील सरोजिनीनगर पोलीस स्टेशन परिसरातील बंथारा येथे 4 दिवसांत दोन भावांचा मृत्यू झाला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार आज (शुक्रवार) सकाळी मॉर्निंग वॉकवरून आलेल्या ४५ वर्षीय मोनू सिंगची तब्येत अचानक बिघडली आणि त्याचे निधन झाले. तर चार दिवसांपूर्वी मोनूता धाकटा भाऊ अभिषेक सिंग उर्फ ​​पवन याचाही मृत्यू झाला होता. पवन हा हृदयविकाराचा झटका आल्याने कोर्टात पडला आणि त्यात त्याचे निधन झाले. दोन्ही भावांच्या मृत्यूने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.

दोन्ही भावांच्या कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पवनच्या मृत्यूनंतर मोनू सिंग यांना मोठा धक्का बसला होता. ते आज सकाळी ५ वाजताच्या सुमारास ते मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. माघारी परतल्यानंतर त्यांनी औषध घेतले, मात्र काही वेळाने त्यांची प्रकृती बिघडू लागली. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना ताबडतोब खाजगी रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत त्यांची प्रकृती गंभीर बनली आणि त्यांचा मृत्यू झाला

कुटुंबातील सदस्यांच्या माहितीनुसार, मोनू हा त्याचा धाकटा भाऊ पवनवर खूप प्रेम करत होता. मोनूने त्याच्या मेडिकल स्टोअरचे नाव पवनच्या नावावर ठेवले होते. पवन सरोजिनी नगर तहसीलमध्ये वकील होता. त्याचे लग्न पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणार होते. मात्र ९ जून रोजी अचानक पवनला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचे निधन झाले.

पवनचा मृत्यू झाल्यानंतर मोनू दु:खी झाला होता. मात्र आता त्याचाही मृत्यू झाला आहे. दोन्ही मुलांच्या मृत्यूमुळे घरात गोंधळ उडाला आहे. घरातील महिला बेशुद्ध पडल्या असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातून दुःख व्यक्त केले जाते आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group