राज्यातील घडामोडींना वेग आला असून आता महाराष्ट्रातील ५ विधानपरिषद निवडणुकांचं बिगुल वाजलं. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली. अमरावती, पुणे, नागपूर, संभाजीनगर या ठिकाणी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी 23 ऑक्टोबर रोजी मतदान होईल. तर याची मतमोजणी 27 ऑक्टोबर रोजी होईल. निवडणुकीच्या घोषणेमुळे राजकीय हालचालींना वेग येणार आहे.
महाराष्ट्रातील पाच विधानपरिषदेच्या जागेच्या निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. विधानपरिषदेतील रिक्त होणार्या जागांवर निवडणुका होणार आहेत. या विधानपरिषदेच्या निवडणुकीची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. या निवडणुकीसाठी अर्ज प्रक्रिया ही 29 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. तर 23 ऑक्टोबर रोजी या जागांसाठी मतदान होणार आहे. तर 27 ऑक्टोबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. ५ जागांवर निवडणूक जाहीर करण्यात आल्याने सर्व राजकीय पक्ष आता जोरदारपणे कामाला लागण्याची शक्यता आहे.
शिक्षक आणि पदवीधर निवडणुकांसाठी २९ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात होणार आहे. ६ ऑक्टोबर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. या निवडणुका महायुतीत होणार की स्वतंत्र लढवण्यात येणार हे पाहणं महत्वाचे राहिल. कारण महायुतीमधील घटक पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढवण्याची देखील इच्छा व्यक्त केली आहे. या निवडणुकांच्या घोषणांमुळे आता सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत.