२२ सप्टेंबर २०२६
नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावे या उद्देशाने अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे, सह आयुक्त मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नपदार्थांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. नाशिकच्या पंचवटीमधील शरदचंद्र पवार मार्केटयार्ड येथील श्री बालाजी फ्रुट ट्रेडर्स या ठिकाणाहून एफडीएच्या पथकाने 56 हजार 200 रुपये किमतीचे 75 किलो वातूला ब्रँडचे गाईचे तूप व 2 लाख 45 हजार 700 रुपये किमतीची 900 किलो हळद पावडर जप्त केले आहे.
अन्नसुरक्षा मानके कायदा 2006 मधील तरतुदीचे उल्लंघन होत असल्यामुळे व कमी दर्जाच्या संशयावरून तसेच मानवी आरोग्याच्या दृष्टीने हे दोन्ही अन्नपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई अन्नसुरक्षा अधिकारी गोविंदा गायकवाड यांनी केली.
Copyright ©2026 Bhramar