भावा-बहिणीच्या नात्याला काळीमा ! प्रॉपर्टीसाठी नराधम भावाचं सख्ख्या बहिणीसोबत संतापजनक कृत्य
भावा-बहिणीच्या नात्याला काळीमा ! प्रॉपर्टीसाठी नराधम भावाचं सख्ख्या बहिणीसोबत संतापजनक कृत्य
img
नंदिनी मोरे
आजकाल गुन्हेगारीच्या प्रमाणात भबयाणाकर वाढ होताना दिसत आहे. दरम्यान अनेक कारणावरून गुन्हे घडताना दिसत आहेत. प्रॉपर्टीवरून बहीण भावंडांमध्ये अनेक वादाच्या घटना घडत असतात. परंतु आता एक धकाकदायक अशी घटना समोर आली आहे.  प्रॉपर्टीवरून एका नराधम भावाने आपल्या सक्ख्या बहिणीसोबत अतिशय संतापजनक असं कृत्य केल्याची घटना उघडकीस आली आहे. 

भावा-बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. वडिलोपार्जित मालमत्तेसाठी एका भावाने आपल्या सख्ख्या बहिणीला वेड्याचे इंजेक्शन देऊन तिला खोट्या बहाण्याने मानसिक रुग्णालयात दाखल केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चतुर्शृंगी पोलिसांनी आरोपी धमेंद्र इंदूर रॉय आणि चार खासगी बाऊन्सरवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने सर्वांना धक्का बसला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५६ वर्षीय पीडित महिलेची पुण्यातील चतुर्शृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वडिलोपार्जित मालमत्ता आहे. या मालमत्तेवर ताबा मिळवण्याच्या हेतूने आरोपी धमेंद्र इंदूर रॉय याने चार खासगी बाऊन्सरच्या मदतीने पीडित महिलेवर बळाचा वापर केला. त्याने पीडितेला तिच्या घरात घुसून, तिची मानसिक स्थिती उत्तम असतानाही तिच्या डाव्या हातात इंजेक्शन देऊन तिला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. यानंतर, रक्त तपासणीच्या नावाखाली तिला खोटे सांगून मानसिक रुग्णालयात दाखल केले. या कृत्यामुळे पीडितेला गंभीर मानसिक छळ सहन करावा लागला.

चतुर्शृंगी पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपी धमेंद्र इंदूर रॉय आणि त्याच्यासोबत असलेल्या चार बाऊन्सरवर भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींची चौकशी सुरू केली असून, या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी पीडित महिलेची सुटका करून तिला सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group