Nashik : इन्स्टाग्रामवर उमेदवाराची बदनामी करणारी पोस्ट व्हायरल
Nashik : इन्स्टाग्रामवर उमेदवाराची बदनामी करणारी पोस्ट व्हायरल
img
Prashant Nirantar



नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिक मनपा निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवाराचा हुबेहूब चेहरा मॉर्फ करून त्याखाली आक्षेपार्ह मजकूर तयार करून बदनामीची पोस्ट इन्स्टाग्रामवर व्हायरल केल्याप्रकरणी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोठी बातमी ! माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी मुकेश दिलीप शहाणे (रा. शांती चौक, पवननगर, नाशिक) हे मनपा निवडणूक लढवीत असून, ते काल (दि. ५) मोबाईल हाताळत असताना इन्स्टाग्राम आयडीवरून माँटी दळवी याने कोणाच्या तरी सांगण्यानुसार फिर्यादी शहाणे यांची जनसामान्यांमध्ये बदनामी करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर फिर्यादीसारखा दिसत असलेला हुबेहूब चेहरा मॉर्फ करून अश्लील फोटो अपलोड करून त्या फोटोवर आक्षेपार्ह मजकुराची पोस्ट इन्स्टाग्रामवर व्हायरल करून बदनामी केली आहे.

या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात इन्स्टाग्राम आयडीधारक माँटी दळवीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group