नाशिक महानगरपालिकेत भाजप शिवसेना युती , उपमहापौर पदी 'यांची' लागणार वर्णी
नाशिक महानगरपालिकेत भाजप शिवसेना युती , उपमहापौर पदी 'यांची' लागणार वर्णी
img
वैष्णवी सांगळे
काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या निवडणूका पार पडल्या त्यामुळे महापौर आणि उपमहापौर कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. भाजपाला नाशिकमध्ये मोठे यश मिळालेले होते त्यामुळे महापौर भाजपचाच होणार हे जवळपास निश्चित होते. त्या अनुषंगाने भाजपने महापौर पदासाठी हिमगौरी आहेर - आडके यांना तर उपमहापौर पदी मच्छिंद्र सानप यांना उमेदवारी दिली होती. 

आता नाशिकमध्ये सत्ता समीकरण बदलताना दिसत आहे कारण नाशिक महानगरपालिकेत भाजप आणि शिवसेनेने युती केली आहे. त्यामुळे महापौर पदी हिमगौरी आहेर - आडके यांची तर उपमहापौरपदी विलास शिंदे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. थोड्याच वेळात हि घोषणा होईल. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group