नाशिक : माजी नगरसेवकाकडे मायलेकाने मागितली दहा कोटींची खंडणी
नाशिक : माजी नगरसेवकाकडे मायलेकाने मागितली दहा कोटींची खंडणी
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- इन्स्टाग्रामवर बदनामीकारक मेसेज व व्हिडिओ प्रसारित करण्याची व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन माजी नगरसेवकाकडे दहा कोटी रुपयांची खंडणी मागणार्‍या मायलेकासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी गोकुळ आनंदराव पिंगळे (रा. गंगापूर लिंक रोड, मखमलाबाद रोड, नाशिक) माजी नगरसेवक असून, जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की दि. 29 जून 2025 रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास संशयित महिला व तिचा मुलगा फिर्यादी यांच्या घरासमोर मोठमोठ्याने आरडाओरडा करीत होते. 

वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट

फिर्यादीसह त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचे बदनामीकारक मेसेज व व्हिडिओ इन्स्टाग्रामवर प्रसारित करून दहा कोटी रुपयांची मागणी केली. हे पैसे दिले नाहीत, तर जिवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दि. 12 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास संशयित महिला ही पुन्हा फिर्यादीच्या घरी आली.

आरडाओरडा व शिवीगाळ करून “तुम्ही जर आता पैसे दिले नाहीत, तर तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून तुमचे आयुष्य बरबाद करीन,” अशी धमकी दिली. या प्रकारानंतर फिर्यादी पिंगळे हे घरात निघून गेल्यानंतर संशयित महिला पिंगळे यांची पत्नी व मुलगा यांना म्हणाली, की दहा कोटी रुपयांचा बंदोबस्त लवकरात लवकर करा. नाही तर मी माझे व तुमच्या पतीचे इन्स्टाग्रामवर बदनामीकारक मेसेज व व्हिडिओ प्रसारित करीन, अशी धमकी दिली.

या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मायलेकाविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group