नाशिक : विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन मुलांची डीएनए टेस्ट, पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा
नाशिक : विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन मुलांची डीएनए टेस्ट, पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा
img
वैष्णवी सांगळे
नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मुलांचे डीएनए टेस्ट करून तिच्याशी अनैतिक कृत्य करणार्‍या पती व सासू-सासर्‍याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी विवाहितेचे अंबड परिसरात माहेर आहे. ही विवाहिता दि. 22 मार्च 2014 ते 15 फेब्रुवारी 2026 या कालावधीत औंध, पुणे, म्हसोबा चौक, कामटवाडा शिवार व मोशी, पुणे येथे सासरी नांदत होती. त्या वेळी सासू व सासरे हे तिच्या पतीला उलटसुलट सांगून विनाकारण भांडण उकरून वाद घालत असत. 

फिर्यादी ही बाहेर गेली असता घराला लॉक लावून सासू व सासरे निघून गेले, तसेच फिर्यादीला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तर पतीने विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन मुलांची डीएनए टेस्ट केली, तसेच भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ केली. 

त्याचप्रमाणे विवाहितेला गरोदरपणाच्या काळात त्रास होत असतानादेखील तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवून नको त्या गोष्टी करण्यास भाग पाडून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात पती, सासू आणि सासरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबतचा पुढील तपास पोलीस हवालदार महाजन करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group